Blog

सुख म्हणजे नक्की काय असते—-?

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

आजच्या आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात आपण सर्वजण सुखाच्या पाठीमागे धावत आहोत जसा ऊन सावलीचा खेळ असतो अगदी तसाच होऊन पुढे पुढे सावली त्याच्या मागे उन असा खेळ चालूच असतो तसेच जीवनात सुख पुढे पुढे आपण त्याच्या मागे मागे धावतो फक्त भौतिक सुखच आपल्याला सुख वाटते पण वास्तवात तसं नाही भौतिक सुखाचा सोबतच आत्मिक सुखाचा आनंद हा आगळा वेगळा असतो एखादी वस्तू आपल्याकडे नसले तर त्या वस्तू बद्दलची आवड आकर्षण सुख आपल्याला मिळावे असे वाटते पण तिच वस्तू जर आपल्याला प्राप्त झाली तर तिचे महत्त्व तेवढे आपल्याला वाटत नाही आपल्याकडे खूप श्रीमंती आहे वैभव आहे धन-धान्य सोने-नाणे पैसा-अडका भरपूर आहे परंतु आत्मिक सुख किंवा आनंद नसेल तर ते खरं सुख आपल्याला लाभत नाही एखाद्या नसलेल्या किंवा अदृष्य वस्तू बद्दल आपण आशा व्यक्त करून दुःखी होतो दिवसभर काम करणारा शेतकरी मजूर कष्टकरी संध्याकाळी आनंदाची झोप घेतो ते खरे सुख होय.

कधीकधी प्रश्न पडतो की खरे सुख म्हणजे नक्की काय असते संताने म्हटल्याप्रमाणे सुख जवा पाडे दुःख पर्वताएवढे मानवी जीवनामध्ये दुःख हे मोठ्या प्रमाणावर असते अगदी पर्वताएवढे दुःख असते त्या प्रमाणात सुख फक्त जवा एवढे असते संतांना खरोखर सुख प्राप्त झाले तो त्यांचा अनुभव आहे त्यांनी सुखाची प्राप्ती करून घेतली त्यांनी अनुभूती घेतली म्हणूनच संत म्हणतात रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी कुणाला कशात सुख आहे तर कुणाला कशात पंढरपूर मधील शेकडो वर्षापासून आषाढी कार्तिकीला भक्तीचा उसळलेला महापुर पाहून डोळे आनंदून जातात व खरच सुख आपल्या मनाला मिळते ऊर भरून येते आपोआप अश्रू पाझरू लागतात त्या सोहळ्यातील घोड्याचे गोल रिंगण मेंढी चे गोल रिंगण भजन कीर्तन चंद्रभागा डोळ्यांनी पाहून खरं सुख आपल्या डोळ्यांना मिळतं तेच सुख आपल्या मनाला मिळतं टाळ-मृदुंगाचा आवाज कानि पडतो याची दुसरी बाजू म्हणजे म्हणतात ना सुख नेहमी माणसाच्या अहंकाराचे मोठेपणाचे परीक्षा घेत असते तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेत असते आपले जीवन व प्रपंच म्हणजेच एक परीक्षा आहे आणि आपला कळत-नकळत त्या परीक्षेला सामोरे जात असतो आणि जो कोणी या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होईल तो जीवनात खरा सुखी होतो जीवनात यशस्वी होतो.

आता आजची परिस्थिती आपण पाहूया आज जगातील वातावरण कोरोना महामारी मुळे खुपच बदलून ढवळून निघाले आहे लाखो लोक आपल्यातून निघून गेले आहेत काही आजारी आहेत उद्या काय होईल सांगता येत नाही म्हणून वर्तमान काळातील जगणं हे सुंदर कसं होईल आनंदी कसं होईल सुखी कसं होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे शरीराची सुंदरता वयाबरोबर हळूहळू संपत जाते पण मनाची स्वच्छता सुंदरता कायम टिकून राहते कुणाला कशात सुख मिळते तर कोणाला कशात टीव्हीवरील पारिवारिक मालिका आपण दररोज पाहतो त्यातून आपल्याला आनंद व सुख मिळते क्रिकेट मॅच पाहून काहीना सुख मिळते सुखाची परिपूर्ण व्याख्याच आपण करू शकत नाही कारण सुख हे क्षणिक असते सावलीसारखे असते आपल्या जीवनापासून सुख आणि दुख आपल्याला चिकटलेले असतात ते वेळ प्रसंगी आपल्या समोर उभे राहतात आपण आपल्या कर्मांनी कर्तव्याने ती मानून घ्यायची असतात.

सुख ही काही वस्तू नव्हे सुख बाजारात मिळत नाही किंवा विकत मिळत नाही म्हणून आपण भौतिक सुखाच्या मागे न लागता आत्मिक सुख शोधले पाहिजे आंतरिक सुख शोधले पाहिजे व नेहमी आनंदी प्रसन्न राहिले पाहिजे जेणेकरून आपण आपला परिवार आपला समाज आणून आनंदून गेला पाहिजे संताने म्हटल्याप्रमाणे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण नेहमी हसत खेळत सकारात्मक विचारांमध्ये गढून जा यश व सुख आपोआप आपल्याकडे येत राहील काही लोकांना दुसर्यांना दुःख देण्यात सुख मिळत असते पण ज्यावेळी आपण दुसऱ्या बद्दल वाईट विचार करतो तेव्हा आपल्या बद्दल सुद्धा दुसरा दुप्पट वाईट विचार करतो आपण इतरांबद्दल चांगलाच विचार मनात ठेवला तर आपले दुप्पट चांगले झाल्याशिवाय राहत नाही हा निसर्गाचा सरळ सरळ नियम आहे.

निसर्गाच्या नियमानुसार चालत राहणे खरतर हेच सत्कर्म आहे आणि निसर्गाच्या विरुद्ध चालत राहणे यालाच दुष्कर्म असे म्हणतात काही लोकांचं जीवनच दुसऱ्याचा विचार करत करत संपून जाते स्वतःचं जगणं राहून जातं मग जीवनाच्या मार्गात जो सरळ चालत राहतो तो सुखी होतो आनंदी होतो त्याला सुख मिळते पण जो उलट-सुलट चालत चालतो तो नेहमी दुःखी चिंताक्रांत उदास निराशेच्या गर्तेत अडकला जातो त्याला सुख मिळत नाही.

जीवनात मनाचे समाधान ही अंत:करणाची सर्वात सुंदर संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती मिळाली तो जगात सर्वात सुखी मानवा व हेच खरे सुख होय…!

धन्यवाद…!🙏🏻🙏🏻

Related posts