पंढरपूर

मंगळवेढा नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा देऊ – अभिजीत पाटील

पंढरपूर – छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. आपण राहतो त्या ठिकाणी आपल्याला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असावा अशी इच्छा मंगळवेढ्यातील शिवभक्तांची आहे. मंगळवेढा व परिसरात डिसेंबर १६६५ साली छत्रपती शिवाजी महाराज येथे २५ दिवस वास्तव्य होते. ही येथील नागरिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येथे पुतळा असायला हवा या विचारातून श्री.अभिजीत पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.

गेल्या २५ वर्षांपासून होत असलेल्या शिवभक्तांच्या मागणीचा विचार कुणाकडूनच होत नव्हता. त्यानंतर मंगळवेढेकरांनी यासंबंधी सुरु केलेली “सह्यांची मोहीम” सुरु केली बद्दल पत्रकार हुकूम मुलाणी यांची बातमी वाचली श्री.अभिजीत पाटील यांनी तेथे पुतळा बसवण्यासाठी काय अडचण येत आहे नगरपालीका मुख्यधिकारी यांच्या कडून माहिती  घेतली श्री.अभिजीत पाटील याना लक्षात आली. त्यानंतर एक शिवभक्त म्हणून आपण पुढाकार घेतला पाहिजे असे त्यांना वाटले आणि एक भव्य अश्वरूढ पुतळा देण्याची तयारी श्री.अभिजीत पाटील यांनी दर्शवली. त्यासाठी लागणारी जागा आणि परवानगी मिळावी असे निवेदन तहसीलदार साहेब, नगराध्यक्ष मॅडम, नगरपालीका मुख्यधिकारी निशिकांत पंरचडराव साहेब तसेच ज्ञानेश्वर कोंडूभैंरी अध्यक्ष सार्वजनिक शिवजंयती मंडळ यांच्याकडे श्री.अभिजीत पाटील यांनी दिले आहे.

श्री.अभिजीत पाटील यांच्या या भूमिकेचे मंगळवेढ्यातील नागरिकांकडून स्वागत होत आहे तसेच नवतरुण शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या तालुक्याला यामुळे एक पूर्णत्व नक्कीच येईल. संबंधित अधिकारी वर्गाकडून हा ठराव कधी मंजूर होईल याची प्रतिक्षा शिवभक्तांना लागली आहे.

Related posts