महाराष्ट्र

आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, महाराष्ट्र दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला: संजय राऊत

आम्ही करेक्ट कार्यक्रम करत महाराष्ट्राला दोन वर्षापूर्वी स्वतंत्र करत भगवा फडकवला असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. शिवसेना नगरसेवक डी. जी. सुर्यवंशी यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नाशिक महापालिकेत शिवसेनेचे 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

..म्हणून तीन कृषी कायदे मागे घेतले

 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी केंद्र सरकारवरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, 1947 साली जसे आंदोलन झाले, ‘चलेजाव’ची चळवळ झाली म्हणून ब्रिटिश सरकार पळाले. तसेच जनता रस्त्यावर आली असती कोण पंतप्रधान, कोण गृहमंत्री आहे हे जनतेने पाहिले नसते. त्यामुळेच कायदे मागे घेतले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

 

मोदी नगरसेवकपदासाठी उभे राहिले तर पराभव

 

संजय राऊत यांनी म्हटले की, आपण ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’ ह्या संत वचना प्रमाणे गेल्या 50 वर्षांपासून काम करत आहोत. नाशिक महापालिकेत शिवसेना शतक करणार आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 100 नगरसेवक निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेची महिला आघाडी जोरात आहे. मोदी नगरसेवक पदाच्या निवडणुकीला उभे राहिले तकी डी. जी. सुर्यवंशी निवडून येतील असेही राऊत यांनी म्हटले. नाशिकमधील अनेकांना जमिनीवर आणावे असेही त्यांनी शिवसैनिकांना म्हटले.

 

चंद्रकांत पाटील यांना चिमटा

 

कार्यक्रमाआधी संजय राऊत यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलकांचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला निर्णय दु:खद असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. चंद्रकांत पाटील यांना दु:ख वाटत असेल तर त्यांना शोक संदेश पाठवू, शोक सभा आयोजित करू असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

Related posts