पंढरपूर

वारकर्यांचा कार्तिकी वारी करण्याचा निर्धार … ! श्री विठ्ठला समोर झाले भजन आंदोलन.

पंढरपूर/ प्रतिनिधी

विठ्ठल मंदिर खुले करावे, भजन कीर्तनास परवानगी द्यावी, कार्तिकी वारीस परवानगी देण्यात यावी.आदी मागण्यांसाठी अखिल भाविक वारकरी संघटनेचे ह.भ.प सुधाकर इंगळे यांच्या उपस्थितीत विठ्ठल मंदिर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले.


वारकर्यांना कार्तिकी यात्रेस परवानगी द्यावी.यावेळी वारकरी संप्रदाय शासनाचे सर्व नियमांचे पालन करतील जर शासनाने कार्तिक वारीत अडथळा निर्माण केल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला.

आषाढी, कार्तिकी विसरुनका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला अधिक महत्व आहे.मागील आषाढी यात्रेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन नियमांचे पालन करुन साजरी करुन शासनाला सहकार्य केले.सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आल्याने शासनाने बाजारपेठा,एस.टी.बसेस,चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे.त्याप्रमाणे कार्तिकी वारी सोहळा शासनाचे नियम घालून भरवण्यात यावा.

कार्तिकी वारीला पारंपारिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी ५० भाविकांना सर्व नियम घालून परवानगी देण्यात यावी, दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यास परवानगी द्यावी,आळंदी येथील समाधी सोहळ्यास,नगर प्रदक्षणा व पारंपारिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी.तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणार्या दिंडीला ५० भाविकांना परवानगी द्यावी.यांसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले.

याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेने दिला आहे.

Related posts