कविता 

विठ्ठल-विठ्ठल-विठ्ठल

माळ विठ्ठल, टाळ विठ्ठल
वीणा विठ्ठल, चिपळ्या बोले
विठ्ठल विठ्ठल

गोरा कुम्भाराच्या,
मातीत विठ्ठल, पाण्यात विठ्ठल
मडकया मडक्यात विठ्ठल सामावला…,

ज्ञानेश्वरांच्या ओवी
ओवीत विठ्ठल, पसायदानात विठ्ठल
तुकोबांच्या अभंगात, गाथेच्या पानापानात
शब्दात विठ्ठल…

जनाबाईच्या गोवरयात
नामदेवाच्या किरत्नात
पहावा विठ्ठल…

संत नरहरी सोनाराच्या सोन्यात विठ्ठल,
सेना न्हावी च्या कात्रित विठ्ठल,
सावता माल्याच्या मल्यात विठ्ठल,
चोखा मेल्याच्या, मनात विठ्ठल

आकाश विठ्ठल. पाताळ विठ्ठल
सर्वत्र विठ्ठल व्यापीएला।।🙏🏻🙏🏻

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts