अक्कलकोट

दिनेश गिरीजी व गणेश पुरीजी महाराजांची वटवृक्ष मंदिरास दर्शन भेट 

(प्रतिनिधी अक्कलकोट) –
अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव येथील सदगुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमाचे महंत दिनेश गिरिजी महाराज व गणेश पुरीजी महाराज, कळवण येथील सिद्धारूढ आश्रमाचे मनीषा दीदी यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. 

याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी बोलताना दिनेश गिरीजी महाराज यांनी श्री स्वामी समर्थांची लीला ही अगाध आहे. उदात्त हेतूने कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामी समर्थांचे नामस्मरण, नामजप केल्याने भाविकांची मनोकामना नक्कीच पूर्ण होते असा मला अनुभव असल्याचे सांगितले. समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आपले जीवन स्वामी सेवेसाठी पणाला लावले आहे.  समाधानी वृत्तीने स्वामी सेवा करताना त्यांची आत्मियता व त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व पाहून मनाला समाधान लाभले असल्याचे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ..

याप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष विद्याताई पाटील, प्रेमभक्ती साधना केंद्राचे सदस्य सिंधुताई ढोकळे, प्रभाकर आहेर, भगवान पगार, संतोष पवार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, महादेव तेली, स्वामीनाथ लोणारी इत्यादी उपस्थित होते.

Related posts