तुळजापूर

धाराशिव (उस्मानाबाद) तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना आ. कैलास पाटील यांनी दिली भेट.

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी,

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा प्रकारच्या संकट काळात शिवसेनेचे धाराशिव जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास (दादा) पाटील हे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी सरसावले आहेत. शिवसेनेच्या “20% राजकारण व 80% समाजकारण” या तत्वांप्रमाणे आ. मा. कैलास (दादा) पाटील यांनी उस्मानाबाद तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या. झालेल्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला. खानापूर, भानसगाव, सोनेगाव, जुणोनी, वलगुड, झरेगाव, चिलवडी, सुर्डी ता.उस्मानाबाद (धाराशिव) या गावांमध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची शिवसेनेचे कळंब-धारशिवचे आमदार मा. कैलास (दादा) पाटील यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

मागच्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद-कळंब तालुक्यातील शेतीचे भयावह नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन,जनावरे वाहून गेले आहे, अनेक ठिकाणी ऊस, फळबागा आडव्या झालेल्या, त्यासोबत घराचं पण प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं दिसून आले. हातातोंडाशी आलेलं पीक असं उध्वस्त झालं की शेतकरी हवालदिल होतो. त्यांना धीर देण्यासाठी व आधार देण्यासाठी शेतकरी बांधवांशी मा. आ. कैलास पाटील यांनी संवाद साधला. या कठीण प्रसंगी राज्य सरकार नक्कीच शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे यावेळी मा. कैलास (दादा) पाटील यांनी अश्वाशीत केले. नुकसान भरपाई मिळण्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना अधिकारी वर्गाला यावेळी आ. मा. कैलास पाटील यांनी केल्या.

याप्रसंगी कळंब-धाराशिव चे आमदार मा. श्री. कैलास (दादा) पाटील यांच्यासह धारशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी, जि.प.सदस्य नितीन शेरखाने, पं.स.मा.उपसभापती शाम भैय्या जाधव, अभिजित देशमुख, महेश देशमुख, विभागप्रमुख सौदागर जाधव, तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव, तहसीलदार गणेश माळी, मनोज तात्या पड़वळ ,जुणोनी मा.सरपंच अमोल मुळे, उदय पाटील, नितीन धोंगडे, तानाजी ढोकळे, विष्णू तांबे, शिवाजी ढोकळे, मधुकर सोनवणे, पापासाहेब तांबे, मौला शेख, चंद्रकांत बाकले, शंकर खंडागळे, शरद गायकवाड, जीवन गायकवाड, आण्णा बचुटे, नितीन भोंग, बिभीषण जाधव, परमेश्वर मुळे, संपत भोंग, ग्रा.सदस्य नितीन भोंग, किरण जाधव, अण्णासाहेब बचुटे, योगेश भोंग, किशोर भोंग, सुनिल बचुटे, मुकेश बचुटे, रमेश बचुटे, जगन बचुटे, आकाश बचुटे, सचिन भोंग, संदिप गोफणे, कपिल शिंगाडे,गोपाळ गोफणे, पृथ्वीराज रानखांब,रामा मचाले, आण्णा कदम, शिवाजी खैरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

Related posts