प्रतिक शेषेराव भोसले
गंधोरा, प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावचे सुपुत्र, गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे अन्याया विरुद्ध आवाज उठवणारे, अशी ओळख प्रस्थापित केलेले, माजी तंटामुक्त अध्यक्ष विजयकुमार शामराव मुसळे
वय वर्षे – ७२ यांचे १३ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले, शांत आणि संयमी स्वभाव या मुळे ते पंचक्रोशीत ओळखले जात होते, त्यांच्या अशा अकाली जाण्याचा पंचक्रोशिला धक्का बसला आहे.
गेले काही दिवस ते आजारी होते, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यामुळे त्यांना तुळजापूर येथील शासकिय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते.
पहाटे चारच्या सुमारास उपचारा दरम्यान शनिवारी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गंधोरा गावावर शोककळा पसरल्याने, तालुका स्तराबरोबरच जिल्हा स्तरावर देखिल संबंधितांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.