पंढरपूर

खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शिवमल्हार ब्रिगेडतर्फे विविध कार्यक्रम

सचिन झाडे –
पंढरपूर –

पुणे येथील कार्यालयात शिवमल्हार ब्रिगेडतर्फे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे उद्घाटन राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी खा.शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दिनदर्शिका प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’चे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच केक कापून पवार साहेबांचा वाढदिवस साजरा केला करण्यात आला.

यावेळी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सोशल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे, शहराध्यक्ष प्रमोद भोसले,माने,शिव मल्हार ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील,माळशिरस तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील,सांगोला तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,पश्चिम माहाराष्ट्र अध्यक्ष यशराजे पाटील,पुणे जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील,अोमराजे पाटील,वैभव खंडाळे,शुभम सावळकर,उत्कर्ष इंगळे,युवराज चरवड,आदि.उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस व शिवमल्हार ब्रिगेडतर्फे २००४ पासून खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबविले जातात.यामध्ये रक्तदान शिबीर,हुशार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप,वृध्दाश्रमात ब्लँकेट व खाऊ वाटप,तसेच अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात येते.असे राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले.

Related posts