कविता 

रंगमंचावर वातावरण तयार होण्यासाठी वाजंत्री वाद्य वाजवितो – ऋषिकेश लांडे_पवार

रंगमंचावर वातावरण तयार होण्यासाठी वाजंत्री वाद्य वाजवितो.*

माझ्या उज्वलतेसाठी माझा बाप इमानदारीने जगतो मलाही इमानदारी शिकवतो.
हे जगसुध्दा अडकलेय लालचेच्या अदभुत जाळ्यात.
आता माणुसकीच आणावी लागेल विकत मोळयात.
प्रत्येकाला आपल्या मोठेपणावर गर्व आहे अमाप.
किती लाभ घेशील रे नुसते सोडुन तोंडातून वाफ….

कोणाच्या मागे बोलुन जर मनाला शांती वाटत असेल तर निश्चिंत बोलावे ….
पण आपण एक इमानदार माणुस असल्याचे स्वतःच्याच मनाला कसे पटावे…..
एखाद्या व्यक्तिमत्त्वावार बोलायला स्वतःचाही कुवत लागते…
त्यासारखे न बनावे परी बोलण्यात शर्मेने तरी घ्यावे उरते…..

स्वतःला सिध्द करताना आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो ….*
आत्मविश्वासाने जगतोस तर अश्या पोकळ धमक्यांना का भितो ….
स्वतःच्या पायावर उभारून कमाव तुझ नाव….
तुझ्या विजयावर शिक्कामोर्तब करायला तु निडर धाव

आपल्याला पण आयुष्यात तेवढिच मिळते वो जेवढी आपण इतरांना देतो इज्जत…..

आपल्याही मनात श्रद्धा व नम्रता असेल तर दिव्यासारखा संयम ठेवावा विझत…..

तुला जे काही ज्ञान आहे ते सगळ्यांना वाटुन टाक निडर….

ज्ञानवाटपाच्या या दुनियेत जयघोषात निर्विघ्नपणे होऊन जाशील लिडर….
================================
🚩🚩

कवि:-
ऋषिकेश नानासाहेब लांडे-पवार
बामणी, धाराशिव.

Related posts