उस्मानाबाद  तुळजापूर

चिकुंद्रा येथे कोविड १९ चे लसीकरणाचा शुभारंभ.

चिकुंद्रा प्रतिनिधी / कृष्णात सर्जे

चिकुंद्रा ता तुळजापूर येथे दि १३.एप्रिल २०२१ रोजी वय वर्ष ४५ च्या पुढील व्यक्तींसाठी आरोग्य विभागाच्या वतीने कोविड १९ च्या लसीकरणाचा शुभारंभ नळदुर्ग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ रत्नाकर जानराव व सरपंच श्री राणबा जाधवर यांच्या हस्ते करण्यात आला.

चिकुंद्रा व परिसरामध्ये कोविड 19 चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे व दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढतच आहे. त्यामळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते कोविड -19 ची लस आमच्या गावातील आरोग्य उपकेंद्रात द्यावी व चिकुंद्रा व परिसरातील प्रत्येक लोकांना सदर लसीचा लाभ घेता यावा यासाठी ग्रामपंचयात च्या वतीने आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रशाषनास विनंती करण्यात आलेली होती. त्या अनुषंघाने जिल्हा प्रशाषनाणे सदर विनंती तात्काळ मान्य केली. व लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

या लसीकरणासाठी वय वर्षे ४५ च्या पुढील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता लसीकरणाच्या पाहिल्याच सत्रात १५५ नागरिकांनी आपले लसीकरण करून घेतले. सदर लसीकरण हे यापुढे प्रत्येक आठवड्याला दर मंगळवारी असेल असे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

या लसीकरणाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे डॉ.शेख सर, आरोग्यसेविका यस.बी. गोरे मॅडम, एन जे उकीरडे मॅडम, लसटोचक रागिनी सुरवसे मॅडम, उपसरपंच श्री शंकर भैरु मोटे, ग्रामपंचयात सदस्या सौ. सुमन अरुण गायकवाड, प्रा संजय मोटे, प्रा बालाजी गायकवाड, अंबादास मोटे, केशरताई जाधवर पत्रकार पुरूषोत्तम बेले ,पत्रकार कृष्णात सर्जे,व गावातील अन्य नागरिक उपस्थित होते.

लसीकरणाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या सौ शोभा एकंडे व राणी जाधव, निर्मला गायकवाड तसेच ग्रामपंचयातचे कर्मचारी, गोपाळ गरड, सतीश गरड, सौदागर गायकवाड, सिद्धेश्वर गायकवाड, बंडूराजे गायकवाड,आदींनी परिश्रम घेतले.

Related posts