अक्कलकोट

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – .
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी प्रथमेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निवडीनंतर दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील हमाल भवनात दुधनी आडत भुसार व्यापारी असोसिएशनच्यावतीने नूतन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, बाजार समितीचे उपसभापती सिद्धाराम बाके, आडत व भुसार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोशी आदी उपस्थित होते…

यावेळी बाजार समितीचे संचालक सातलींगप्पा परमशेट्टी, प्रतिष्ठित आडत व्यापारी शिवानंद माड्याळ, बसवण्णप्पा धल्लू, गुरुशांत ढंगे, महानिंगप्पा परमशेट्टी, गिरमल्लप्पा सावळगी, शिवानंद हौदे, सचिन माशाळ, मल्लिनाथ येगदी, अशोक पादी, रेवसिद्ध पाटील, संजय नूला, रामचंद्र गद्दी, गुरुशांत हबशी, रतीश कोटनूरसह आडत व भुसार व्यापारी, बाजार समितीतील इतर कर्मचारी, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts