अक्कलकोट

राज्य आश्रमशाळा वसतिगृह संचालक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी जावेद पटेल यांची बिनविरोध निवड.

अक्कलकोट प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा वसतिगृह संचालक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी अक्कलकोट च्या नागनहळ्ळी आश्रम शाळा के.बी.एन संस्थेचे सचिव जावेद पटेल यांची बिनविरोध निवड झाली. महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा कार्यकारिणीची घोषणा नुकतीच झाली. वसतिगृह संचालक संघाची राज्यव्यापी सर्वसाधारण सभा औसा मनोहर तांडा येथे रविवारी पार पडली. या सर्वसाधारण सभेला राज्यातील सर्वच आश्रमशाळा – वसतिगृह संस्थांचे अध्यक्ष व संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वानुमते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामदास जयसिंगराव चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी माजी न्यायमूर्ती भीमराव जाधव, तात्या सूर्यवंशी (सांगली), मिठाराम राठोड (माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) नारायण जाधव,
रामराव राठोड, भरत राठोड, अनिल आडे (यवतमाळ), बापूराव राठोड, उत्तम लालसिंह राजपूत (सोलापूर),माणिक राठोड, बाबासाहेब कांबळे, शालीनी चव्हाण (जि.प. सदस्या,लातूर), कमल जाधव, बसवराज पाटील उदगीरकर, वनमाला राठोड, माजी कृषी सभापती उस्मानाबाद बाबूराव राठोड, गुलाबराव जाधव, रोहिदास राठोड (नंदुरबार), उत्तम राठोड, प्रवीण राठोड (कन्नड), दत्ता राठोड (बीड), सुरेश पलांडे (पुणे) यांच्यासह राज्यातील कानाकोपऱ्यातून वसतिगृह- आश्रमशाळा संस्थांचे अध्यक्ष उपस्थित होते. सर्वप्रथम धर्मगुरु रामराव बापू महाराज व लालसिंग राजपूत यांना श्रद्धांजली अर्पण करून सर्वसाधारण सभेची सुरुवात झाली.महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणाही या बैठकीतकरण्यात आली.यावेळी अध्यक्ष म्हणून रामदास चव्हाण, कार्याध्यक्षपदी नारायण जाधव, अनिल रामजी राठोड, जावेद पटेल, बापूराव राठोड यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी तात्या सूर्यवंशी (सांगली), गोविंद राठोड (जालना), रोहिदास राठोड (नंदुरबार), राजेश राठोड (जळगाव), गंगाधर राठोड (नांदेड), दिनेश पवार (बीड), माणिकराव हणमंतराव राठोड, पल्लवी वैभव भोयर (यवतमाळ), सरचिटणीसपदी रामराव राठोड, उत्तमसिंग लालसिंग राजपूत, नीलेश राजमाने, सचिवपदी प्रवीण राठोड (औरंगाबाद), गोवर्धन चव्हाण (चंद्रपूर), बाबासाहेब कांबळे (परभणी), वनमाला राठोड (यवतमाळ), संजय पवार, भंडारी
(नागपूर),

कोषाध्यक्षपदी बाबूराव जाधव, अॅड. सुधाकर जाधव, सुरेश पलांडे, कार्यकारिणी सदस्य गुलाब जाधव, बसवराज पाटील, रामसिंह
जाधव, मधुकर पवार, सुधाकर जाधव, पांडुरंग राठोड, शिवाजीराव भिकाणे,प्रवीण भोंडवे, विनोद राठोड तर सल्लागार समितीपदी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मिठाराम राठोड, माजी आमदार किसनराव राठोड, संजय राठोड (मंत्री म.) आमदार इंद्रनिल नाईक, आमदार तुषार राठोड (मुखेड), राजेश राठोड, आमदार मंठा, माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ राठोड, वजाहद मिर्झ यांची कार्यकारिणीवर सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. या निवडीबद्दल माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आर पी आय प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे, प्रकाश वानकर, अशोक लांबतुरे, डाँ.श्रीकांत येळेगांवकर आदींनी अभिनंदन केले.

Related posts