तुळजापूर

कांदा निर्यात बंदीच्या विरोधात तुळजापूर शिवसेनेचा एल्गार

साईनाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.
राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक काक्रंबा येथे.शिवसेनेच्या वतीने भाजप केंद्र सरकाराने घातलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णया विरोधात जागरण गोंधळ घालून आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या फोटाला कांद्याचा माळा घालण्यात आल्या तसेच यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी बोलताना सांगितले की लवकरात लवकर हा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा केंद्रीय मंञ्याच्या गाड्या धाराशिव जिल्ह्यात कुठे ही फिरू देणार नाही असा इशारा दिला आहे. यावेळी शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण यांनी बोलताना स्थानिक आमदार हे केंद्रीय कृषीमंत्री यांना कांदा निर्यात बंदी मागे घेण्यासाठी पञ लिहण्याचे धाडस दाखवतील का? असा खडा सवाल यावेळी तुळजापूर च्या भाजपा आमदारांना विचारला. या आंदोलनाचे निवेदन स्विकारण्यास मंडळअधिकारी कुलकर्णी, तसेच तलाठी पवार हे उपस्थित होते. या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवासेना जिल्हा चिटणीस लखन कदम परमेश्वर, शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, तुळजापूर उपशहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, शिवसेना काक्रंबा गणप्रमुख कालिदास सुरवसे, काक्रंबा जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर, भारत पाटील, उमेश खांडेकर, शाम माळी, शहाजी नन्नवरे, बालाजी पांचाळ, किसन देडे, शंकर गव्हाणे, राजेंद्र म्हंकराज, शाहूराज लोखंडे, सचिन सोनवणे, सोमनाथ सुरवसे, दिपक भिसे, सिद्राम कारभारी, जितेंद्र माने, अक्षय काळे, स्वप्नील जटाळ, राम घोगरे, विनोद साबळे, नितेश माने, प्रवीण क्षीरसागर यांच्यासह शेतकरी वर्ग काक्रंबा ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी या आंदोलनास भिम आण्णा सामाजिक संघटनेच्या वतीने लेखी पञ देऊन पाठींबा दिला. यावेळी संघटनेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष सुरेश आप्पा भिसे, अशोक जाधव, किशोर साठे, दत्ता भाजे, युवराज भिसे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कांदा हे पीक अतिशय खर्चिक व कष्टाळू असून त्याला भाव मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. ही निर्यात बंदी जर नाही उठली तर शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवेल. शेतकरी हा या कृषिप्रधान देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्याच्यावरच अशा प्रकारची संकटे लादली जात आहेत. हा निर्यातबंदीचा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा अन्यथा केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. ही बंदी जर नाही उठवली तर धाराशिव जिल्ह्यातच काय, संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही केंद्रीय मंत्र्यांची गाडी फिरू देणार नाही.
-श्री. जगन्नाथ मनोहर गवळी
(शिवसेना तालुकाप्रमुख, तुळजापूर.)

Related posts