उस्मानाबाद  तुळजापूर

अपसिंगा/कामठा ते वरवंटी रास्ता तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी शिवसेनेचे अमिरभाई शेख यांची मा. जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा/कामठा ते वरवंटी रास्ता दुरुस्ती करणे बाबत अपसिंगा चे शिवसेनेचे ग्रा. पं. सदस्य मा. अमिरभाई शेख यांनी उस्मानाबाद च्या मा. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अपसिंगा – उस्मानाबाद मार्गावरील कामठा ते वरवंटी पर्यंतचा रास्ता पुर्णतः खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठं-मोठे खड्डे पडलेले असून बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरील खडी उघडी पडलेली आहे.

त्यामुळे अपसिंगा, कात्री, कामठा, वरवंटी येथील नागरिकांना तुळजापूर, अपसिंगा उस्मानाबाद प्रवास करतेवेळी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर अपघाताची शक्यता / धोका निर्माण झाला आहे.

सदरील रस्त्याबाबत तोंडी अनेकदा सांगूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे असे यावेळी मा. अमिरभाई शेख यांनी सांगितले. तरी संबंधित यंत्रणेला तात्काळ या रस्त्याच्या दुरुस्ती चे आदेश देण्यात यावेत अशी मागणी यावेळी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे मा. अमिरभाई शेख यांनी केली.

Related posts