तुळजापूर

बँड-बँज्यो चालक संघटनेच्या वतीने व्यवसाय परवानगीसह आर्थिक मदत मिळण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन.

साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर प्रतिनिधी.

बँड-बँज्यो चालक संघटनेच्या वतीने व्यवसाय परवानगीसह आर्थिक मदत मिळण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, कोरोना या जागतिक महामारीमुळे जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद पडलेली आहे. यामुळे महाराष्ट्रात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका उस्मानाबाद जिल्ह्यातील बँड-बँज्यो व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.
बँड/बँज्यो पथकात काम करणारे कलाकार सध्या हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. फेब्रुवारी ते ऑक्टोबर या महिन्यात ९०% समारंभाचे कार्यक्रम असतात. बँड/बँज्यो पथकासाठी हा आर्थिक कमाईचा हंगाम असतो. मात्र या काळात व्यवसाय बंद असल्याने बँड/बँज्यो कलाकारांना विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे. तसेच १० कलाकार व गाडी वाजवण्याची परवानगी देऊन बँड/बँज्यो पथकाची उपासमार होत असलेली थांबवावी. तसेच शेजारील सोलापूर व लातूर जिल्ह्यातील बंदी उठविली असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे या जिल्ह्यातील बंदी सुद्धा उठवावी अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी संगटनेचे जिल्हाध्यक्ष मा. प्रेमानंद सपकाळ यांच्यासह अनेक बँड बँज्यो कलाकार उपस्थित होते. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रेमानंद सपकाळ, नाना कसबे, गोपाळ सपकाळ, प्रवीण क्षीरसागर, सूरज कसबे, दत्ता भोसले, वामन देडे यांच्यासह अनेक कलाकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related posts