कविता 

वेळ अमावसेचा सण—-

कवि
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव,
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर जिल्हा उस्मानाबाद
———————————-

आली वेळ अमावस्या
काळ्या आईचा हो सण
काळ्या आईची नवलाई
रानमेव्यानी नटलेली,सजलेली

सहकुटुम्ब -सहपरिवार
बैल गाडिचा प्रवास
प्रातःकाळी निघतसे
जीवा शिवाची बैल जोड़

शेता शेतात करिती
कडबा, तनसाची खोप
खोपीमधे होत असे
पाच पांडवाची आरास

भज्जी ,रोड़गा, आम्बिल
खीर उंड्याचा नैवैद्य
आनंदाने दाखविती
गृह लक्षमिचा थाट

पोरबाळ आनंदाने खेळी
पतंगाचा खेळ लाल,नीला
,पिवळा पतंग वार्यासंग जाई
ऊंच ऊंच आभाळत

निसर्गदेविचा प्रसाद
रानमेव्याची आरास
पेरू,चिंच,बोरे शेंगा
मधमाशाचे मोहोळ

वेळ अमावसेचा सण
झाला आंनदी आनंद
सायंकाल झाली तसा
ओसरला हा आंनद

परम्परेपासुन चालूआहे
वेळ अमावसेचा सण
सर्वधर्म, समभाव, एकता,
एकोप्याचे होई दर्शन

वेळ अमावसेचा हा सण

Related posts