तुळजापूर

तुळजाभवानी मंदिर परिसरात सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा – प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी :-सलमान मुल्ला

सोमवारपासून आई तुळजाभवानी मातेचं मंदिर सोमवारपासून भाविकांसाठी खुलं झालं आहे. मात्र, मंदिर परिसरात पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजल्याचं चित्र पहायला मिळालं.

त्याचबरोबर भाविक, पुजारी आणि व्यापारी मास्कविना फिरताना पाहायला मिळाले. महत्वाची बाब म्हणजे मंदिर संस्थान, पोलीस आणि नगर परिषदेकडूनही मास्क न वापरणाऱ्यांना रोखण्याची तसदी घेतली गेली नाही.

तुळजाभवानी मंदिर परिसरातील हळद-कुंकु, फुले आदी व्यापाऱ्यांनी मास्क न घालता दुकानं बिनदिक्कत सुरु ठेवली होती. इतकच नाही तर सरकारकडून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना मंदिरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पण 65 वर्षावरील नागरिक आणि 10 वर्षाखालील मुलांनाही दर्शनासाठी मंदिरात आणण्यात आलं होतं. दर्शन रांगेतही अनेक भाविक विना मास्क उभे होते. तर थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर यंत्रणाही कार्यान्वित नव्हती.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातून मोठ्या संख्येनं भाविक येतात. मात्र भाविकांकडून मंदिर परिसरात कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related posts