कविता 

हे नव वर्षा- – – –

हे नवीन वर्षा

आम्ही सज्ज तुझ्या स्वागता निसर्गातील सप्त रंगांच्या
विविध फुलांच्या
दरवळणाऱ्या सुगंधाने
सज्ज तुझ्या स्वागता
प्रात: काळच्या
सुवर्ण किरणांनी
प्रसन्न मनाने सज्ज
तुझ्या स्वागता
हे नववर्षा रानातल्या
हिरव्यागर्द रानमेवा
भाजीपाला फळे फुलांनी आम्ही शेतकरी,अन्नदाता
सज्ज तुझ्या स्वागता।

हे नववर्षा आम्ही करोडो देशवासी हृदयाच्या
मंगलतेने,एकतेने राष्ट्रप्रेमाने
सज्ज तुझ्या स्वागता
हे नववर्षा थंडीच्या लाटेत वायूच्या लहरीत
बर्फवृष्टी झेलत सैनिक आम्ही सज्ज तुझ्या स्वागता
नवीन युगात नवीन वर्षात
नवीन तंत्रज्ञान ऑनलाइन शिक्षण घेऊन आम्ही विद्यार्थी सज्ज तुझ्या स्वागता

हे नववर्षा सज्ज तुझ्या स्वागता

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts