महाराष्ट्र

महत्वाच्या बातम्या ठाकरेंनी खोडले आरोप याच्या सह इतर ही बातम्या

दादरच्या इंदू मिल परिसरात उभारण्यात  येणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज अचानक पुढे ढकलण्यात आलाय , अचानक घेतलेल्या निर्णयामुळे  अनेक तर्कवितर्क  लावले जात होते , अनेक अफवा चे पेव फुटले होते अखेर  खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय ,या कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण दिले गेले नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून मंत्रिमंडळात नाराजीचा सूर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला  होता. आक्षेपाची  तातडीने दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश दिले आणि मानापमानाच्या  वादावर मुख्यमंत्र्यांनी पडदा टाकलाय   . हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.मुख्यमंत्र्यांनी आजचा कार्यक्रम पुढे ढकलून मोठा वाद टाळला आहे.  

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर राज्यातील नोकरभरती स्थगित करण्याच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे, सोलापुरात दररोज आंदोलने आणि मराठा संघटनेच्या बैठक होतायेत , मराठा समाज नेते आपल्या परीने विविध नियोजन करीत आपला संताप व्यक्त करतायेत , सोलापूर काही मराठा नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत आपला राग व्यक्त केलाय तर मराठा  आरक्षण वर निर्णय घ्यावा  मराठा क्रांती मोर्चा च्या कार्यकर्त्यांना सरकारला आपल्या रक्ताने पत्र  लिहलंय 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सध्या राज्यातील वातावरण चांगलचं पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना आता छत्रपती उदयनराजेंनीही यात उडी घेतलीय आपण  राजकारण करत नाही, पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच अशी भावना भाजपाचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले व्यक्त केलीय सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. आपण  कधीही राजकारण केले नाही. केवळ मराठा समाज नाही तर कोणत्याही समाजावार अन्याय होत असेल तर त्यांच्यासाठीही लढणार, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तरी राजीनामा देईन, पदावरुन राहून आपण काय करु शकत नसलो तर त्याचा उपयोग काय? वेळ आली तर राजीनामा देईन असं त्यांनी सांगितले. सध्या लोकशाही आहे, राजेशाही असती तर दाखवलं असतं. अन्याय होत असेल तर लोकशाहीच्या राजांनी राजासारखं वागावं असा सल्लाही राज्यकर्त्यांना दिलाय 

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बॉलिवूड सिनेसृष्टीवर ती सातत्याने आरोप करत आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि जया बच्चन यांच्यासोबत तिचं शाब्दिक द्वंद्व सुरु आहे.  उर्मिला मातोंडकर यांना सॉफ्ट पॉर्न करणारी अभिनेत्री असं म्हटलं होतं. “उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं.” अशी टीका तिने केली होती. या टीकेमुळे बॉलिवूड विरुद्ध कंगना असा सुरु असलेला वादात आता तिने अभिनेत्री सनी लिओनीला देखील ओढलं आहे. “सनी लिओनीला स्विकारणाऱ्यांना पॉर्नस्टार हा शब्द आता अश्लिल वाटू लागलाय”, असा उपरोधिक टोला तिने टीकाकारांना लगावला आहे.“सनी लिओनीसारखे कलाकार आदर्श नसावेत अशी भूमिका मांडणाऱ्या एका लेखकाला या मंडळींनी शांत केलं होतं. अॅडल्ड इंडट्रीमधून आलेल्या सनी लिओनीला एक कलाकार म्हणून त्यांनी स्विकारलं. अन् आता पॉर्नस्टार हा शब्द त्यांना अश्लिल वाटू लागलाय. याला बनावटी स्त्रीवाद म्हणतात.” अशा आशयाचं ट्विट कंगनाने केलं आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एन निवडणुकीच्या तोंडात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर माजी मॉडेलने एक धक्कादायक आरोप केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप अ‍ॅमी डोरिसने केलाय  डोनाल्ड ट्रम्प यांनी २० वर्षांपूर्वी माझं लैंगिक शोषण केलं असा आरोप या मॉडेलने केला आहे.‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत अ‍ॅमी डोरिसने हा खळबळजनक आरोप केला आहे. ५ सप्टेंबर १९९७ रोजी US ओपन टेनिस स्पर्धा होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या व्हिआयपी बॉक्समधील बाथरुममध्ये माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असा आरोप अ‍ॅमी डोरिसने केला आहे. अ‍ॅमी डोरिसने म्हटलं आहे की “त्यावेळी मी २४ वर्षांची होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी माझा लैंगिक छळ केला. मी तिथून सुटून, पळूनही जाऊ शकत नव्हते. मी डोनाल्ड ट्रम्पना मागे ढकलत होते. त्यांचा प्रतिकारही करत होते. मात्र त्यांनी तरीही माझा लैंगिक छळ आणि शोषण केलंच. हा अनुभव  भयंकर होता. या घटनेनंतर  आपल्या  मनात अत्यंत विचित्र भावना येत होत्या. खूपच वाईट वाटत होते” असंही अ‍ॅमी डोरिसने सांगितलं आहे. ‘द गार्डियन’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. 

Related posts