महाराष्ट्र

गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, शरद पवार यांचं प्रत्युत्तर

सगळीकडे मला पांडुरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं, मला गुरु म्हणायचे आणि माझ्यावर आरोप करायचे, असा टोला शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना लगावला आहे.

राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह कुठे जाणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो. पहिली मी निवडणुक लढलो त्याचे चिन्ह होते बैल-जोडी, त्यानंतर गाय-वासरू चिन्ह, त्यानंतर चिन्ह मिळाले चरखा नंतर हात या चिन्हावर निवडणूक लढलो. चिन्ह जाणार नाही आणि जाऊ देणार नाही. चिन्हे कोण घेऊन जाऊ शकत नाही, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

माझ्याशिवाय नाणं वाजणार नाही –

आज काही जणांनी मेळावा घेतला, त्यात सर्वात मोठा फोटो माझा होता. त्यांना माहितीय की त्यांचं नाण वाजणार नाही, त्यामुळे फोटाचा वापर केला जातोय, असेही शरद पवार म्हणाले. त्यांनी काही भाष्य केले त्यावर मी काही बोलणार नाही. आज मुंबईत अनेक ठिकाणी पोस्टर लावले त्यात फोटो माझा होता. त्यांना माहीत आहे आपले नाण चालणार नाही, पण पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही थांबवू शकत नाही, असेही पवार म्ङणाले.

फडणवीसांवर हल्लाबोल –

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी अनेकवेळा भाष्य केले वेगळा विदर्भ केला पाहिजे. पण आज काय झालं विदर्भाबाबत काही करत नाहीत, असे शरद पवार म्हणाले. भाजपसोबत गेले ते संपले आहेत. भाजपकडून विरोधी पक्ष फोडण्याचे काम सातत्याने सुरु आहे, असेही पवार म्हणाले.

भाजपवर हल्लाबोल –

शिवसेनेचे हिंदुत्व 18 पगड जातींना घेऊन जाणारे आहे. भाजपचे हिंदुत्व विखारी, मनुवादी आणि विद्वेषक आहे. भाजपचे हिंदुत्व समाजात फूट पाडणारे आहे. राज्यात दंगली घडल्या, दंगलीमध्ये कोण होते हे लोकांना माहीत आहे. जाणीवपूर्वक यांनी दंगली केल्यात. जाती आणि धर्मांमध्ये अंतर वाढवतो तो राष्ट्रवादी नसतो, समाजामध्ये फूट पाढतो तो राष्ट्रवादी नसतो, राष्ट्रवादी त्यांच्यासोबत जाणार नाही, अशी टीका शरद पवार यांनी भाजपवर केली.

पंतप्रधान मोदींवर टीका –

आम्ही सरकारमध्ये नाही. आम्ही जे सत्तेत नाहीत त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. देशाच्या प्रश्नांची चर्चा करतोय. माझी त्यावेळी पद्धत असायची एखादी निर्णय घेतला की लोकांशी बोलणे आणि ऐकून घ्यायचे असते. पण आज देशात ती पद्धत नाही. आज देशात आणि सर्व राज्यात असंतोष आहे. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद सुरू करायला हवा. बिहार पाटण्यात आम्ही बैठका घेतल्या. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी अस्वस्थता निर्माण केली आहे. देशाचे पंतप्रधान म्हणाले राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला. राज्य सहकारी बँकेचा दाखला दिला, पंतप्रधान यांनी कुठलाही आधार नसताना अशी विधाने करू नये, असे शरद पवार म्हणाले.

Related posts