महाराष्ट्र

मोठा राडा जंतर-मंतरवरील कुस्तीपटूंचे तंबूही हटवले

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं.

त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे.

नव्या संसद भवनाचं रविवारी ( २८ मे ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन झालं. दुसरीकडं नवीन संसद भवनाच्या समोर धडकू पाहणाऱ्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुरक्षेचं कारण देत पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळाला. यासह जंतर-मंतर मैदानावरील कुस्तीपटूंचे तंबूही पोलिसांनी हटवले आहेत.

कुस्तीपटू साक्षी मलिकने एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात पोलीस बळाचा वापर संगीता फोगाट आणि विनेश फोगाट हिला गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. तिच्या हातात भारतीय ध्वज तिंरगाही दिसत आहे. ट्विटवर साक्षी मलिकने लिहलं की, “आपल्या खेळाडूंना अशी वागणूक दिली जात असून, जग सगळं पाहत आहे.”

Related posts