कळंब

कळंब येथील चोरीचा चार दिवसात पर्दाफाश, मुद्देमालासह आरोपी ताब्यात

सलमान मुल्ला
कळंब/उस्मानाबाद प्रतिनिधी,
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील दि.16/12/2020 रोजी कळंब शहरातील महावीर ज्वेलर्स मध्ये दागीने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या 04 महीलांनी हातचलाखी करुन 16 चांदीचे पैंजण जोड (495 ग्रॅम )चोरुन नेले होते ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले होते.

गुन्हा तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यातील 03 बुरखाधारी महीलांना दि.20/12/2020 रोजी ताब्यात घेउन चोरी केलेला नमुद माल त्यांचेकडुन जप्त केला आहे.

उर्वरीत पोलीस तपासाठी त्यांना कळंब येथील पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कामगीरी पोउपनि श्री. माने, पोना/ चव्हाण, पोकॉ/ आरसेवाड, मपोकॉ/ होळकर, चापोना/ कावरे यांचे पथकाने केली अहे.

Related posts