कविता 

हे मावळत्या सूर्या- – – –

हे मावळतीच्या सूर्या
तू दिलं ते खूप दिलं
उद्या येणार्या कार्याला
अशीच भरभरून गती दे
हे मावळत्या सूर्या तुझं लखलखत सौंदर्य प्रसन्नता दे तुझी दिशा, तुझी गती आम्हाला मिळू दे हे मावळतीचा सुर्या

तुझे वलय, मावळता उत्साह नवीन दिवसाची प्रेरणा नवीन आचार-विचार कल्पना दे
हे मावळतीच्या सूर्या नवीन वर्षात जगण्याची नवीनशक्ती दे बळ दे हे मावळत्या सूर्या
तुझ्या एका एका किरणांनी संपूर्ण जग उजळून जाऊ दे येणाऱ्या संकटांचा मुकाबला करण्याची शक्ती दे मुक्ती दे हे मावळत्या सूर्या तुझ्या तेजाने आमचे आरोग्य निरोगी सुदृढ राहू दे सकारात्मक तेने नकारात्मकता जळून जाऊदे जुने जाऊ दे मरणालागुनी जगण्यासाठी नवीन ऊर्जा दे हे मावळत्या सूर्या नवीन वर्षात नवीन संकटाच्या या जंगलात उडण्यासाठी माझ्या पंखात बळ दे हे मावळत्या सूर्या तू पुन्हा नव्याने ये

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

Related posts