करमाळा

वाहून जाणारे ओव्होरफ्लोचे पाणी सिना नदीत सोडून सिना कोळगाव धरणात सोडावे.

करमाळा प्रतिनिधी उमेश पवळ

करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील शेतकरी बांधवांची जलदायनी म्हणून उपयुक्त असलेल्या कोळगाव धरणात तीन वर्षे प्रतीक्षेनंतर पाणी आले आहे. त्यामुळे शेतकरी बांधव आनंदीत झाले आहेत. यापूर्वी धरणात सलग तीन वर्षे उपयुक्त पाणी साठा नसल्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत हवालदिल झालेला होता. पाणी साठा अत्यंत कमी होता त्यामुळे तोही पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता. मागील वर्षी अनेक वेळा कुकडी प्रकल्पाचे ओव्होरफ्लोचे वाहून जाणारे पाणी धरणात सोडण्याची मागणी केली होती परंतु प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले होते. या वर्षीही पूर्व भागातील शेतकरी बांधवांची मागणी आहे की, सिना कोळगाव धरण परिसरात आणखीन एकही मोठा पाऊस झाला नाही त्यामुळे धरण पूर्ण भरते का नाही याची शास्वती नाही त्यामुळे कूकडी प्रकल्पाचे अतिरिक्त वाहून जाणारे ओव्होरफ्लोचे पाणी सिना नदीत सोडून सिना कोळगाव धरणात सोडावे.

यावर्षी अहमदनगर जिल्ह्यात सिना नदी पाणलोट क्षेत्रात पाऊस भरपूर झाल्यामुळे व अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव गांगडी धरण पूर्ण भरल्या मुळे सिना नदीत पाणी वाहत आहे. ते पाणी धरणात आले आहे. या पाण्याचे विधिवत पूजन करून खणा, नारळाची ओटी भरून आलेल्या पाण्याचे पुजन नेरले ग्रामपंचायत माजी सरपंच औदुंबरराजे पाटील, निमगाव ह सरपंच प्रतिनिधी व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील, उपसरपंच विठ्ठल जगदाळे, कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष राजेंद्र भोसले, ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ ननवरे, ज्येष्ठ नागरिक आंबऋषी भील, माजी सदस्य गोकुळ साळुंखे, बप्पा रोकडे, कालिदास नीळ, अजिनाथ टाळके, ग्रामपंचायत शिपाई बाबासाहेब जगताप व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts