उस्मानाबाद 

मांजरा प्रकल्पातुन कालव्या मार्फत आवाड शिरपुरा व सौन्दना आंबा बंधाऱ्यात पाणी सोडले.

आवाड शिरपुरा, सौन्दना आंबा परिसरातील शेतकऱ्यांनी खा. ओमराजे निंबाळकर यांचे मानले आभार..!

शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर काटकसरीने वापर करण्याचे खा. ओमराजे निंबाळकर यांचे आवाहन.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव (उस्मानाबाद) येथील मांजरा प्रकल्पातून कालव्या मार्फत आवाड शिरपुरा व सौन्दणा आंबा बंधाऱ्यात पाणी सोडले आहे. याबद्दल या परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे लोकप्रिय खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

उन्हाळा पिकांची अवस्था व पाण्याची होत असलेल्या अडचणी पाहता विठ्ठल कालवा पाणी वापर सहकारी संस्थे मार्फत आवाड शिरपुरा, सौन्दना आंबा परिसरातील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्या बाबत अधिक्षक अभियंता, मांजरा प्रकल्प, लातूर यांच्या कडे वारंवार मागणी केली होती. मात्र संबधित अधिकारी टाळाटाळ करत होते व पैसे भरून घेत नव्हते. याची खा. ओमराजे निंबाळकर यांनी गंभीर दखल घेऊन, दि.03 मे 2021 रोजी श्री. मेत्रे अधिक्षक अभियंता, मांजरा प्रकल्प, श्री.मित्तल नवरे, संस्थेचे चेअरमन व व्हाईस चेअरमन रामलिंग तात्या आवाड व परिसरातील शेतकरी समवेत पवन राजे कॉम्प्लेक्स उस्मानाबाद येथे बैठक घेऊन विठलं पाणी वापर संस्थेचे पैसे भरून घेण्याच्या व पाणी सोडण्या बाबत संबंधित अधिकाऱ्यांना सुचना केल्या.

त्याअनुषंगाने दि 04 रोजी या संस्थेचे पैसे भरून घेतले व दि .05 मे 2021 रोजी प्रत्यक्ष या दोन्ही बंधाऱ्यात पाणी सोडून शेतकऱ्यांना देण्यात आले असून शेतकरी आनंदीत झाले आहेत. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

Related posts