सोलापूर शहर

उद्यापासून सुरू होणार सोलापूर शहरासह जिल्ह्यातील किराणा दुकाने, मंडई

सोलापूर : यापूर्वी लागू झालेला लॉकडाऊन १५ मे पासून पुढेही लागू राहील, परंतु अत्यावश्यक सेवेतील सोलापूर शहरासोबतच जिल्ह्यातील किराणा दुकाने, भाजीमंडई तसेच इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. परंतु याठिकाणी गर्दी आढळल्यास १०० टक्के कारवाई होईल, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संदर्भात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाने लॉकडाउन लागू केला आहे. १५ मे च्या सकाळी ७ पर्यंत लॉक डाउन संबंधित निबंध लागू आहेत. त्यानंतर पुढेही लागू राहतील. परंतु या दरम्यान अत्यावश्यक सेवांना मुभा राहील. अत्यावश्यक सेवा ठिकाणी लोकांनी अनावश्यक गर्दी करू नयेत. लोकांनी फिजिकल डिस्टन्सी पाळावेत. अन्यथा पोलीस विभागाला कारवाईचे आदेश दिले आहेत,असेही पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले आहे.

Related posts