दक्षिण सोलापूर

नुकसानग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार – खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज

अशोक सोनकंटले
विशेष प्रतिनिधी दक्षिण सोलापूर

दक्षिण सोलापूर तालुक्यातील भिमा नदीला आलेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देऊ अशी ग्वाही खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी काल महापूर ग्रस्त गावाच्या भेटी दरम्यान दिली आहे.
काल भिमा नदी काटाच्या कारकल,औज मंद्रुप,कुरघोट,टाकळी,चिंचपूर गावात जाऊन पूरग्रस्त आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाना भेटुन विचारपूस केली यावेळी त्यांनी भिमा नदीकाठच्या शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी त्यांच्यासोबत जेष्ठ नेते हणमंत कुलकर्णी सर,तालुका सरचिटणीस यतीन शहा,रेल्वे सल्लागार समिती सदस्य महादेव कोगनुरे,गौरीशंकर मेंडगुदले,विश्वनाथ हिरेमठ,संदिप टेळे,बनसिध्द वडरे,संगप्पा केरके,सुरेश बगले,रायप्पा बन्ने,याच्यासह सर्व गावातील तलाठी, ग्रामसेवक,कृषी सहाय्यक उपस्थित होते.यावेळेस खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी अधिकारी वर्गाना शेती पंचनामे तात्काळ करण्यासंदर्भात सुचना केली आहे….

महापूर येऊन गेले आहे तरी अद्यापही शेतीकाठी विद्युत पुरवठा सुरळीत नाही तरी शेतकरी वर्गाना विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी विद्युत पोल लवकरच उभा करून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावी.
-राजकुमार कुलकर्णी
माळकवठे,ता.दक्षिण सोलापूर.

Related posts