उस्मानाबाद 

शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात 20 कोटी देण्याचे मान्य. – खा. ओमराजे निंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी कारखान्यांच्या कर्जापोटीच्या जिल्हा बँकेच्या शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात 20 कोटी देण्याचे मान्य केले असल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.

तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 24 ऑगस्ट 2020 रोजी रु.152 कोटींचा मा.साखर आयुक्त, पुणे यांना शासकीय थकहमीचा प्रस्ताव आला होता. 25 फेब्रुवारी 2021 रोजी मा.साखर आयुक्त श्री.शेखर गायकवाड यांची साखर आयुक्त कार्यालय, पुणे येथे धाराशिवचे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा बँकेचे चेअरमन सुरेश दाजी बिराजदार यांच्या समवेत भेट घेऊन तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची विनंती केली होती. तो प्रस्ताव सहकार कार्यालय कडे पाठवन्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, मा.केंद्रीय कृषिमंत्री, खासदार मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांनी तो अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा, याबाबत राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील साहेब यांना फोन करून सूचना केल्या होत्या. तसेच सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील यांची परिषद सभागृह, मंत्रालय, मुंबई येथे भेट घेऊन विनंती केली होती.

त्याअनुषंगाने दि. 02 मार्च रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित व अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांची विधान भवन, मुंबई येथे भेट घेतली व सदरील प्रस्ताव मंजुर करण्याची विनंती केली. मा. अजितदादा पवार यांनी या थकहमी पोटी पहिल्या टप्प्यात 20 कोटी देण्याचे मान्य केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, मा.केंद्रीय कृषिमंत्री, खासदार मा.शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा वित व अर्थमंत्री मा.ना.अजितदादा पवार साहेब, सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील साहेब तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे जाहीर आभार यावेळी खा. ओमराजे निंबाळकर व आ. कैलास पाटील यांनी मानले.

Related posts