तुळजापूर

उदयकाळ फाउंडेशन व किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते मा. अमर हबीब यांच्या वतीने अपसिंगा येथील नुकसानग्रस्त लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी.

मौजे अपसिंगा ता. तुळजापूर, या ठिकाणी अतिवृष्टीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे अपसिंगा येथील ग्रा.पं. सदस्य मा. अमिरभाई शेख यांनी उदयकाळ फाउंडेशन, किसानपुत्र आंदोलन सेनेचे प्रणेते अमर हबीब यांच्याशी संपर्क साधला व गावातील झालेल्या नुकसानीची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांचे प्रतिनिधी नितीन राठोड व मयूर बागुल यांना अपसिंगा येथे पाठवले. त्यांनी गावातील नुकसानग्रस्त, निराधार व गरजू व्यक्तींची ग्रा. पं.सदस्य मा. अमिरभाई शेख यांच्या मदतीने यादी तयार केली. या अनुषंगाने मा. अमिरभाई यांनी गावातील अत्यंत गरजू अशा 10 व्यक्तींची यादी तयार करून दिली. दिलेल्या यादीनुसार त्यांनी दि. 10 नोव्हेंबर रोजी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेश या गरजू व्यक्तींना दिला आहे.

या फाउंडेशन ने केलेल्या मदतीमुळे गावकऱ्यांच्या वतीने त्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. तसेच ग्रा.पं. सदस्य मा. अमिरभाई शेख यांनी गावातील नागरिकांसाठी केलेल्या या कार्याचे विशेष कौतुक गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.

यावेळी नितीन राठोड, मयूर बागल, ग्रा.पं. सदस्य अमिरभाई शेख, सौदागर देविदास, ग्रा.पं. सदस्य विश्वास गोलकर, शिवराज नकाते, राहुल सोनवणे, तात्यासाहेब हाके, उमेश राऊत, बालाजी पांचाळ, फरीद शेख, शंकर गिरी, अहमद काझी, सिकंदर शेख, यांच्यासह गावातील अनेक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts