अक्कलकोट

अक्कलकोट येथील टेलरचा मुलगा होणार डॉक्टर परिस्थितीशी झगडत राजस्वची गरुड भरारी.

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
अक्कलकोट शहराजवळील विश्वनगर भागात राहणारा राजस्व मल्लिनाथ कलशेट्टी हा विद्यार्थी परिस्थितीशी झगडत डॉक्टर होणार आहे. त्याचे वडील हे टेलरचा व्यवसाय करत असून घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना राजस्व कलशेट्टी यांनी मात्र आपले ध्येय गाठण्यासाठी ठाम निश्चय केला आहे. त्याच्या या संघर्षाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून समाजातील अनेक क्षेत्रातील व्यक्तीने आपापल्या परीने मदतीचा हात देण्याचा प्रारंभ केला आहे.
राजस्व कलशेट्टी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हे मंगरूळ प्रशालेत झाले आहे .

लहानपणापासून कुशाग्र बुद्धीच्या राजस्वने दहावी परीक्षेत 90. 20 टक्के तर बारावी परीक्षेत 85 . 38 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे .घराची परिस्थिती अतिशय गरिबीची असताना राजस्वने स्वकर्तुत्वावर चमकदार कामगिरी केली आहे. पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयात दोन वर्ष उच्च शिक्षण घेऊन राजस्व याने आयआयटी-जेईई ,इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अंड एज्युकेशनल रिसर्च , बी एच यु परीक्षा वाराणसी विद्यापीठ या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. नीट परीक्षेत संपूर्ण भारतातून 406 बँकेने राजश्व यांनी यश संपादन केले. पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजला एम बी बी एस साठी राजस्व यांची निवड झाली आहे. अतिशय खडतर प्रवास करत राजस्व शिक्षणात मार्गक्रमण करत आहे. राजस्वच्या वडिलांचा टेलरिंग व्यवसाय असून घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे .लॉकडाऊनमध्ये राजस्वच्या वडिलांनी मास्क विकून कुटुंबाचे उदरनिर्वाह केले.

राजस्व कलशेट्टी याने एमबीबीएस करून यूपीएससी परीक्षेत प्रावीण्य मिळविणाच्या संकल्प केला आहे. राजस्वच्या एमबीबीएसच्या शिक्षणासाठी साडे पाच वर्षाच्या कालावधीत दहा ते बारा लाख रुपयांचा खर्च येणार आहे .समाजातील सर्व स्तरातील दानशूर शिक्षणप्रेमी व्यक्तीने राजस्वला त्याचे ध्येय गाठण्यासाठी आर्थिक मदत केली तर त्याला मोठा आधार मिळणार आहे. राजस्व जर भविष्यात उच्च पदावर गेला तर समाजातील अनेकांना मदतीचा हात देणार आहे. यासाठी सर्व समाजातील व्यक्तीने गुणी ,होतकरू राजस्वला मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

राजस्व कलशेट्टी याला कन्नड साहित्यिक अ. बा. चिक्कमणूर, माजी मुख्याध्यापक धुळप्‍पा भजे, विश्वनगर विकास समितीचे संस्थापक फारुक शेख ,शुभम बिराजदार आदींनी आर्थिक मदत केली .याप्रसंगी प्राध्यापक श्रीकांत जिड्डीमनी, मुस्ताक शेख, अशोक हते, अरुण पाटील, जगदीश सौदी, मोहन आहेरवाडी आदी उपस्थित होते. राजस्व कलशेट्टीला आर्थिक मदत करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, डेक्कन जीमखाना, पुणे,SBIN0001110,AC–36045004188 या बँक नंबरवर मदत पाठवू शकता. तसेच अधिक संपर्क मो. 7038586319 यावर करून माहिती घेऊ शकता.

राजस्व कलशेट्टी हा गरीब, होतकरू, कष्टाळू विद्यार्थी आहे. त्याची परिस्थिती जवळून पाहिली आहे. आमच्या भागात राहतात. समाजातील सर्व स्तरातील दानशूर, शिक्षणप्रेमी लोकांनी त्याच्या शिक्षणासाठी यथाशक्ती मदत करावे.
-प्राध्यापक श्रीकांत जिड्डीमनी.

राजस्व हा अतिशय होतकरू व कष्टाळू विदयार्थी आहे. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमकुवत असताना देखील आपलं शिक्षण पूर्ण करण्याचं व आय.ए.एस. होण्याचं ध्येय मनाशी बाळगलयं. त्यानं नुकतीच नीटची परिक्षा उतीर्ण होऊन बी.जे. शासकीय वैदयकिय महाविद्यालय पुणे येथे एम.बी.बी.एस. मध्ये प्रवेश मिळाला आहे. अपेक्षीत खर्च मोठा असल्याने समाजातील सर्व स्तरातील दानशूर व्यक्तींनी यथाशक्ती मदत करावी हि विनंती.
-फारूक शेख, संस्थापक विश्वनगर विकास समिती.

Related posts