अक्कलकोट

जेऊरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित कोरोना योध्दा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
जेऊरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित कोरोना योध्दा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पुरस्कार सोहळा अक्कलकोट पंचायत समिती येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे, दंत तज्ञ डॉ.रोहन वायचल, प्रशासन अधिकारी डॉ. हेरंबराज पाठक,डॉ,अश्विन करजखेड, सरपंच शिवलाल राठोड, माजी तंटामुक्त अध्यक्ष श्रीमंत राठोड, ग्रामसेवक सुरेश कोळी उपस्थित होते. यावेळी जेऊरवाडी ग्रामपंचायतीच्यावतीने वैधकीय अधिक्षक डॉ अशोक राठोड व गटविकास अधिकारी महादेव कोळी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्माणीत करण्यात आले.

डॉ अशोक राठोड म्हणाले की, कोरोनाशी लढताना होम क्वारंटाइन, आयसोलेशनसारख्या प्राथमिक उपचारादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रुणांसोबतच ग्रामीण रुग्णालयाचे माझे सहकारी, प्रशासन, पोलिस, पत्रकार यांनी भरीव सहकार्य केले कोरोना संदर्भातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी महादेव कोळी ,डॉ.हेरंबराज पाठक, अशोक भांजे, डॉ रोहन वायचल यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी उपसरपंच संजय राठोड, ग्रा.पं.सदस्य अनिल राठोड, जेष्ठ पत्रकार राजेश जगताप, पत्रकार स्वामीराव गायकवाड, पत्रकार रमेश भंडारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार पत्रकार विश्वनाथ चव्हाण यांनी केले.

Related posts