पंढरपूर

घाटाच्या बांधकामाची भिंत कोसळली

पंढरपूर-पंढरपुरात चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेला कुंभार घाटाची भिंत बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळी पावसामुळे आडोशी साठी या भिंतीजवळ उभे राहिलेले काही लोक दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

घाटावर भीक मागणारे काहीजण भिंतीच्या आडोशाला उभे असल्याची माहिती मिळाली आहे.भिंत कोसळल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले आणि मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर जेसीबी आणि रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि बचाव कार्यास सुरवात करण्यात आली आहे.
पंढरपूर मध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे तसेच शहरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे.पंढरपूर शहर परिसरात अनेक धोकादायक इमारती आहेत.त्यातच या घटनेमुळे सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

Related posts