उस्मानाबाद  बार्शी

पीकविम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी – खा. ओम राजेनिंबाळकर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

दि. 13 जानेवारी 2023 रोजी सोलापूर येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री मा. श्री. राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत उपस्थित राहुन खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडून पूर्ण करणेसाठी पालकमंत्री महोदय यांचेकडे विनंती केली.

शिराळे येथील फटाका कारखान्याच्या स्फोटामध्ये निधन तसेच गंभीर दुखापत झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी तसेच कारखान्याच्या जवळपास कांदा व इतर पिके होती या स्फोटामुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी, सन 2021 खरीप हंगामात बार्शी तालुक्यात सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईपासून वंचीत 4 मंडळातील शेतकरी बंधूंना धाराशिव जिल्ह्यात जशी नुकसानभरपाई दिली त्याच प्रकारे शासन निर्णयाचा आधार घेऊन मदत तात्काळ वाटप करावी, सन 2022 च्या खरीप हंगामात सततच्या पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या तक्रारी देखील विमा कंपनीला दिल्या पण नुकसान भरपाई देताना शेतकरी वर्गाला एकाच गटात शेती असणाऱ्या भावांना देखील असमतोल केला त्यामुळे विमा कंपनीने केलेले पंचनामे पडताळून पहावे व शेतकरी वर्गावर झालेला अन्याय दूर करावा पीकविम्यापासुन एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी तसेच सततच्या पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशा फळबागांचा 19 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरी करीता प्रलंबित आहे तो तात्काळ मंजूर करावा.

बार्शी तालुक्यातील मंजूर मातोश्री पाणंद रस्ताच्या कामाचा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घ्यावा व सर्व खालील महसूल व सार्वजनिक बांधकाम च्या कनिष्ठ अधिकारी वर्गाला दिलासा द्यावा, कोविड काळात काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा थकीत पगार द्यावा अशा मागण्या पुर्ण करण्यासाठी खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली.

Related posts