अक्कलकोट

शिक्षिका रिंकू जाधवर ( धस) यांचा डॉक्टर कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव.

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – ड्रीम फाउंडेशन सोलापूर तर्फे माजी राष्ट्रपती डॉ .एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सामाजिक शैक्षणिक असे राष्ट्रउभारणीसाठी उल्लेखनीय भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार दरवर्षी करण्यात येतो .यासाठी संपूर्ण राज्यभरातून विविध क्षेत्रातून गुणवंतांचे प्रस्ताव मागवण्यात येतात .

या वर्षीचा पुरस्कार श्रीमती रिंकू जाधवर धस यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात .  श्रीमती रिंकू जाधवर धस या अक्कलकोट तालुक्यातील रामपूर येथील जि. प शाळेत शिक्षिका आहेत .त्यांच्या शाळेसाठी गरीब गरजू हुशारविद्यार्थ्यांसाठी दप्तर वह्या पेन इ. अशा स्वरूपाचे शैक्षणिक साहित्य सतत पुरवतात . कोरोना काळातही मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून त्यांनी शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबवलायामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप पारावरची शाळा तसेच स्वाध्याय  संच वाटप इत्यादी सर्व उपक्रम त्या स्वखर्चातून करतात कोरोना जनजागृती लसीकरणाचे महत्व माझे कुटुंब माझी जबाबदारी .राष्ट्रीय सण ,थोर महापुरुषांची जयंती – पुण्यतिथी साजरे करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवतात .त्यांचा अभिनव उपक्रम म्हणजे गरीब हुशार आर्थिक परिस्थितीने असहाय अशा दहा मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचा त्यांचा संकल्प  आहे .याची सुरुवात त्यांनी २०१८ पासूनच केलेली आहे . वाचू आनंदे ( बिन दप्तराची शाळा) लेखणीतून व्यक्तिमत्व विकास, आदर्श विद्यार्थी, मुल्यवर्धन मूल्यशिक्षण,भाषिक उपक्रम, वाढदिवस, किशोर वयीन मुलींना मार्गदर्शन, हळदीकुंकू महिला मेळावा असे एक ना अनेक उपक्रम राबवून माझी शाळा माझा विद्यार्थी विकास ,विद्यार्थी हेच माझे दैवत या विचाराने त्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व सामाजिक असे अनेक उल्लेखनीय असे नवीनविन उपक्रम नेहमी राबवत असतात .या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल त्यांना याआधीही अनेक संस्था व पंचायत समिती अक्कलकोट यांनी आदर्श शिक्षिका या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे .त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ड्रीम फाउंडेशन तर्फे डॉक्टर कलाम राष्ट्रउभारणी प्रेरणा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शिक्षिका रिंकू जाधवर धस यांनी शिक्षक हा एक सारथी मार्गदर्शक कसा असतो या संदर्भात आपले विचार व्यक्त केले .

यावेळी डॉ . शिवरत्न शेटे ,डॉ . लालासाहेब तांबडे, माजी आमदार शिवशरण ( आण्णा )  पाटील बिराजदार,शहाजी पवार, ड्रीम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशिनाथ भतगुणकी .समन्वयक सौ संगीता भतगुणकी . प्रा परमेश्वर आरबळे, नवनाथ धस आदि मान्यवर उपस्थित होते .

शिक्षिका रिंकू जाधवर धस यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा .

Related posts