उस्मानाबाद 

रा.यु काँ प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्यावरील गुन्हा घ्या, कळंब येथे मागणी

उस्मानाबाद प्रतिनिधी – सलमान मुल्ला

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब इब्राहिम शेख यांच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळंब येथे करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या मार्फत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सदरील मागणी करण्यात आली आहे. औरंगाबाद येथील सिडको पोलीस स्थानकात एका महिलेने महेबुब शेख यांनी नौकरी लावून देतो म्हणून सांगत माझ्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोप लावत गुन्हा दाखल केला आहे.

याच्याविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी कळंब उपविभागीय कार्यालय परिसरात काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर हे षडयंत्र असून सदरील गुन्हा सूडबुद्धीने करायला लावला आहे. म्हणून हा गुन्हा खोटा असून तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पक्षाला आणि शेख यांच्या प्रतिमेला धक्का पोचवण्याचे काम या महिलेच्या मार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे हा खोटा गुन्हा मागे घेऊन या महिलेचा बोलविता धनी कोण आहे, याचा तपास लावून सबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तारेख भाई मिर्झा, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस प्रशांत कवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंतनू खंदारे, अकिब पटेल, सिराज शेख, दिनेश यादव, नितीन वाडे,उमान मिर्झा, रणजित घुले, आदेश काळे, हुजेब बागवान, लाखन गायकवाड, आफताब तांबोळी, लहुराज अष्टेकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts