Blog

शिवसेनेचा पाठीराखा – शिवसैनिकच…!

संतोष नेताजी घोडके
युवासेना नंदगाव जि.प.विभागप्रमुख

========================================================================================================

हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लावलेला शिवसेना वृक्ष या मातीतल्या माणसांच्या मनात एवढा खोलवर रुजलाय की वादळाला कोसळेल,ना कुठल्या शक्तिशाली ताकदीना.शिवसेनेला नेहमीच अडचणीत आणण्याचा डाव अनेकांनी केला परंतु त्या डावाला उधळून लावण्यात शिवसेनेचा पाठीराखा शिवसैनिक यशस्वी झाला आहे.अनितीला नितीवर विजय मिळवता येत नाही,असत्याल सत्याला पराभूत करता येत नाही तसेच शिवसेनेची प्रतीमा मलिन करुन शिवसेना संपत नाही.

शिवसेनेला धक्के देणारे धक्का देता देता कोसळून पडले परंतु शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला कोणीही धक्का लावू शकले नाही कारण त्याचा पाठीराखा शिवसैनिक होता,आहे आणि राहील कारण भगव्याशी अन् शिवसेनेशी एकनिष्ठता त्यांच्या थेंबाथेंबात असते.दिल्लीतल्या धमकीला न जुमानणारा शिवसैनिक गल्लीतल्या धमकींना कसा घाबरेल? धमकीला न जुमानणारा,धोक्याला न घाबरणारा शिवसैनिक शिवसेनेचा आत्मा असतो.कसल्याही परिस्थितीशी सामोरे जाणारा आणि वाराचा हल्ला प्रतीवाराने दुर लोटणारा शिवसैनिकच शिवसेनेचा पाठीराखा म्हणून शोभतो.

वेळ आलीच तर मरण स्विकारणारा परंतू मनातून भगव्याशी श्रध्दा करणारा,शिवसेनेची पुजा करणारा,वचनाला जाणारा,विश्वासाला सार्थ ठरणारा,जनतेसाठी शत्रुशी दोन हात करणारा,झोपलेल्या प्रशासनाला जाग आणणारा,जनतेच्या न्यायासाठी भांडणारा,संकटाच्या वेळी खंबीरपणे उभा राहणारा,हिंदुत्वाचा कैवारी बनणारा,भ्रष्टाचार जाळून खाक करणारा शिवसैनिकच शिवसेनेचा पाठीराखा असतो.पदाचा मोह नसणारा,सत्तेची लालचा नसणारा आणि सदैव जनतेत सामावणारा,मिसळणारा शिवसैनिक शिवसेनेचा कणा आहे,शिवसेनेचेशक्तिस्थान आहे नव्हे…!नव्हे तर पाठीराखा आहे.

जय महाराष्ट्र !

Related posts