Blog

आला आला उन्हाळा, पक्षी सांभाळा

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक – श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर। जिल्हा उस्मानाबाद।

===========================================================================================

🦜🦜🦜🦜🦜🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️🕊️

बघता बघता कोरोनाचे हे एक वर्ष कसं संपून गेले , ते कळलच नाही बघता बघता उन्हाळा सुरू झाला, कडक उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे निसर्ग चक्राप्रमाणे ऋतू बदलत आहे ऋतू बदलल्यानंतर आपले ही सर्व वेळापत्रक बदलून जाते खाण्यापिण्याचे पदार्थ, सवयी,वेळा बदलतात काही सवयी आपल्याला बदलाव्या लागतात उन्हामुळे पाणी पाणी होते व जेवण कमी जाते आपल्या शरीरात सुद्धा स्थूलपणा येतो अगदी आपल्या प्रमाणेच पक्षांचे देखील असेच होत असते

पक्षांची देखील सर्व दैनंदिनी बदलून जाते कडक उन्हामुळे काहिली होते त्यांना दिवसभर पाणी प्यावे लागते पण सहसा पाणी कुठेही उपलब्ध होत नाही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यामुळे त्यांची घरटी त्यांचे घर कुठे करावे हा त्यांच्यासमोर पडलेला मोठा प्रश्न असतो झाडे कमी झाल्यामुळे सर्वत्र ऊनच, अशा कडक उन्हामध्ये थंड सावली किंवा झाड त्यांना दूर-दूर मिळत नाही तेव्हा अशा वातावरणात आपण त्यांना छोटीशी मदत करू शकतो पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो व त्यांचे जीवन वाचवू शकतो

या उपक्रमासाठी आपल्याला जास्त खर्च ही करावा लागणार नाही आपल्या घराच्या माळ्यावर, जिन्यामध्ये पडलेले प्लास्टिकचे डबे किंवा पत्र्याचे डबे जे आपण भंग़ार मध्ये टाकून देणार आहोत, अशा टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू आपल्याला तयार करता येते पत्र्याचे डबे, यापासून आपण चांगल्या प्रकारचे पाणी ठेवण्यासाठी साधन तयार करू शकतो टाकाऊ पासून टिकाऊ हा उपक्रम करून पक्ष्यांचे जीवन वाचू शकतो! उन्हाळ्यात आपल्याला हिरवळ दिसून येत नाही, झाडेही विरळच दिसून येतात तेव्हा आपण आपल्या घरी जागा असेल तिथे छोटी छोटी झाडे लावून त्याचे चांगल्याप्रकारे संवर्धन करू शकतो वृक्ष लावणे व त्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे आपल्याला ते करता येते व केलेच पाहिजे यासाठी सुद्धा अधिक खर्च करायची काहीच गरज नाही हेसुद्धा टाकाऊ पासून टिकाऊ उपक्रम घर बसल्या करू शकतो.

जागतिक वन्यजीव दिन असो वा जागतिक पक्षी दिन असो निसर्गाचे, निसर्गातील विविध जीवांचे, रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे ते आपण केले पाहिजे फक्त पक्षी दिन, प्राणी दिन, एकच दिवस पाळल्याने त्यांच्यावरील संकटे टळणार नाहीत तर सातत्याने चिमण्या पाखरांचे संरक्षण व त्यांची काळजी घेतली पाहिजे आपण सहजतेने पक्षांसाठी भर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो आणि ती सर्वांनी करावी हीच अपेक्षा! मुक्या प्राण्यांचा खूप मोठा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो, ते निसर्गातील मान्यवर घटक आहेत जसे आपण निसर्गातील घटक आहोत पर्यावरणातील घटक आहोत तसेच ते आहेत

पर्यावरण संतुलन ठेवण्यास आपली मदत करतात परंतु आधुनिक तंत्रज्ञानामुळे म्हणावे की काय पण चिमण्यांची संख्या खूप कमी झालेली आहे आपल्या लहानपणी घरा घरात, दारात ,अंगणात, परसात,शेतातील ज्वारिवर थवेच्या थावे चिमण्या असायच्या जास्त करून आपल्या घरातच त्या घरटे करायचा कितीही बाहेर काढले तरी त्यात तिथेच यायच्या व आपले घर बनवायचा दिवसभर कष्ट करून काडी काडी वेचून त्या आपले घरटे तयार करायचा आणि पिला सहित आनंदाने राहायच्या पण आपण मात्र ते घरटे मोडून टाकायचे ।जणु त्यांना सुद्धा माणसात राहायला खूप आवडायचे मिळून-मिसळून एकत्र राहणे आवडायचे

आपल्याला वाटते की आपले घर हे फक्त आपलेच आहे पण तसे नव्हे आपल्या घरावर निसर्गातील विविध सजीव घटकांचा हक्क आहे व शेकडो जीव आपल्या सोबत आपल्या घरामध्ये राहत असतात किडे, छोट्या-मोठ्या मुंग्या, छोट्या-मोठ्या आळ्या ,भुंगे, माशा, मधमाशा, छोटे छोटे कीटक, फुलपाखरे ,बेडूक, पाली,चुचुंद्री ,उंदीर, साप सुद्धा इत्यादी इत्यादी हेच सर्व पर्यावरणातील जीव आपल्या घरात आत्मविश्वासाने राहतात फक्त आपल्याला दिसत नाहीत क्वचित लहान-मोठ्या मुंग्यांचा ग्रुप आपल्याला दिसतो! उन्हाळ्यात सर्व सर्वच जीवांना बाहेर थंड वातावरणात यावे वाटते आपल्याला फक्त चिमण्या कडे लक्ष द्यावे लागेल कारण लहानपणापासून चिमण्या आपल्या खूप जवळच्या असतात बालपणी आपण एक घास काऊचा, एक घास चिऊचा म्हणून त्यांच्यासोबत जेवण केलेले असते, त्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे झालेलो असतो हे विसरता कामा नए म्हणून आपले नैतिक कर्तव्य सुद्धा आहे चिमण्यांना जपणे त्यांची सुरक्षितता ठेवणे त्यांच्या पाण्याची व्यवस्था करणे कारण चिमण्या,पाखरे आपले बालपणीचे मित्र आहेत. व त्यांच्यापासून आपल्याला जीवनात खूप काही शिकायला मिळाले आहे शेवटी आपण सर्वजण मिळून आपले पर्यावरण सुंदर पर्यावरण तसेच आपले पक्षी आपले मित्र म्हणून सर्व जण काळजी घेऊया हीच अपेक्षा ।

धन्यवाद।🙏🏻🙏🏻

Related posts