Blog

वादळ संकटाचे – झुंज मानवाची

लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवास राव
सहशिक्षक श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद

========================================================================================================

मानवी जीवनात कधीकधी खूप संकटे येतात त्या संकटांना बघूनच माणूस शक्तिहीन होऊन जातो घाबरून जातो भेदरून जातो अशा वेळी गरज आहे ती आपले स्वतःचे आत्मबल वाढवण्याचे व सकारात्मक शक्ती विचार करण्याची संयम आणि सहनशीलता बाळगण्याची संकटे काही एकटे येत नाहीत चारी बाजूने संकटे येतात अगदी तीच परिस्थिती आज आलेली आहे आज मानवावर कोरोना महामारी चे भयंकर संकट आलेले आहे चहुबाजूने अचानक आलेल्या संकटांना तोंड देण्याचे काम आज माणसाला करावयाचे आहे

ही परिस्थिती भयंकर संवेदनशील आहे आज आपल्या सर्वांवर भयंकर अशा कोरोनाचा संपन्न संकटाचे वादळ आले आहे या संकटाला न भिता धाडसी पणाने त्याचा मुकाबला करावयाचा आहे पशुपक्षी प्राण्यांमध्ये सुद्धा आलेल्या संकटाला तोंड देण्याची विचारशक्ती व क्षमता जागृत होते व ते आलेल्या संकटावर मात करतात संकटाच्या वेळी एकत्र येतात एकजूट पणाने त्यावर हमला करतात व यशस्वी होतात अगदी तसेच आज आपल्याला संकटाच्या वेळी एकता एकजूट पणा दाखवण्याचे व संकटावर तुटून पडण्याची प्रेरणा आपल्याला घ्यावयाची आहे आज संपूर्ण मानव जातीवरच खूप मोठे भयंकर असे कोरोना महामारी चे वादळ आले आहे या वादळात टिकायचे असेल तर एकमेकांना भेट देऊन सावध राहून जागृत होण्याची गरज आहे व आलेल्या संकटाशी एकत्र येऊन झुंज देण्याची वेळ आहे संपूर्ण ताकदीनिशी एकजूट पणाने झुंज द्यायची आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा या काळात एकमेकांना मदत करणे धीर देणे मानसिक सहाय्यक करणे किंवा आर्थिक सहाय्य करणे जरी हा आजार पसरणारा असला तरी त्यावर बरेच उपाय आपल्याकडे आहेत म्हणून कोणीही घाबरून न जाता त्यावरील उपाय शोधावे

यासाठी आपण पशु पक्षी प्राण्यांची संकटातील एकजूट अपणा मदतीचे भाव छोट्या छोट्या गोष्टींमधून शिकता येईल बलाढ्य मुंगी मुंग्याची संकटात झालेली एकजूट पणा व तिने केलेले कार्य, शक्ती, कबुतरांची शिकार्याच्या जाळ्यात अडकल्यावर एकतेचे बळ देणारी गोष्ट, तसेच मधमाशांचे उदाहरण तर आपल्या समोरनेहमी सर्वांसाठी आहे मधमाशा प्रमाणे जिद्द चिकाटी व एकजूट पणा, आलेल्या संकटावर त्या कशा मात करतात हे आपल्याला पाहावे लागेल कारण सध्या कोरोना विषाणूचा भयंकर काळ चालू आहे, माणसावर मानव जातीवर आलेले एक भयंकर संकट आहे जे मानव जातीला संपवण्याचा, नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे वेळ खूप संवेदनशील आहे शत्रू आपल्या गावापर्यंत नव्हे तर आपल्या घरावर ती नजर ठेवून आहे तेव्हा या राक्षस रुपी संकटावर मात करण्यासाठी आपण जागृत होणे जागरुक राहणे व समाजाला जागृत करणे गरजेचे आहे ही काळाची गरज आहे.

घरी राहणे हीच आता खरी ढाल आहे भारतातील बर्‍याच मोठ्या शहरांमधून रुग्ण मृत्यूशी झुंज देत आहेत कुठे थांबायला शिल्लक जागा उरली नाही. हॉस्पिटल भरून गेले, काही ठिकाणी बेड शिल्लक नाहीत, बेड असेल तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत नाही, असंख्य प्रश्‍न व असंख्य समस्या येत आहेत काही जण भीतीपोटी मृत्युमुखी पडत आहेत पण काही जरी झाले तरी आपल्याला धीर सोडता कामा नये लढत राहायचे आहे, परिस्थितीशी झुंजत राहायचे आहे !शेवटी विजय आपलाच आहे अशी सकारात्मक भावना मनात ठेवून आपण जिंकणारच आहोत अशी भावना, मानसिकता ठेवली पाहिजे आता आपण दुसरी बाजू पाहू या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन झालेले आहे यात सर्वसामान्य मजूर वर्गांचे, गरीब गोरांचे ,ज्यांचे हातावर पोट आहेत अशा सर्वांचे खूप हाल होताना दिसत आहे पण याही परिस्थितीत आपण न डगमगता, डगमगून न जाता जगण्याची जिद्द व परिस्थितीशी झुंज देणे गरजेचे आहे काही सामाजिक संस्था, काही मोठ्या मनाची माणसे अशा गरजू लोकांना कुटुंबांना मदतीचा हात देत आहेत हे खूप मोठे राष्ट्रकार्य करीत आहेत पूण्य कर्म करित आहेत.त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत!

मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे ,आनंदी राहा आनंदी जगा व दुसऱ्याला जगु द्या आज सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती व्याकसिन बाबत जनजागृती करण्याची, सर्वांनी भारतात तयार झालेली सुरक्षित वॅक्सिंन लस घ्यावी व लस घेऊन सुरक्षित राहावे येणाऱ्या एक मेपासून सर्वत्र 18 वर्षावरील नव युवकांना लस मिळणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व निरोगी राहावे. मित्रानो, आज पर्यंत कसाही प्रसंग आला तर आपण देवावर विश्वास ठेवत होतो तशाच विश्वासाने डॉक्टर कडे जात होतो अगदी तसाच विश्वास डॉक्टर वरती ठेवावा व त्यांच्या कार्यावर ठेवावा त्यांच्या सल्ल्यानुसार आपण राहावे कोरोना झालेल्या व्यक्तींनी सुद्धा काहीच घाबरण्याचे कारण नाही त्यांनी फक्त” मला काहीच होणार नाही” असा आत्मविश्वास ठेवावा व आपल्या कुटुंबियांना पण विश्वास द्यावा. थोडा त्रास सहन करावाच लागणार आहे परंतु धाडसी बनावे व उपचार घेत राहावे डॉक्टर म्हणजे देवच आहेत असे मानावे या विचाराने आपला आजार लवकरात लवकर बरा होईल! हे सत्य –सत्य आणि सत्य आहे देवाने सर्वांनाच मनाचा खंबीरपणा दिलेला आहे अशावेळी मनाचा खंबीरपणा कामी येतो आठ ते दहा दिवस झुंजत राहून आपण त्या संकटातून सहज बाहेर पडू शकतो असा अशा आजारातून बरे झालेल्या लोकांचा विश्वास आहे

आता आपण थोडं आध्यात्मिक माहिती कडे वळू या आपल्या मनात ज्या शक्तीबद्दल, ज्या कुलदेवते बद्दल, व ज्या नामस्मरणावर विश्वास आहे, त्याचे नामस्मरण करावे राम नामातच खूप मोठी शक्ती आहे हे आपण सर्वजण जाणता आपल्याला संकटातून तारणार आहे “रामकृष्णहरी” नामजप केल्याने जळतील पापे जन्मांतरीचे असे संतांचे वचन आहे विठ्ठल नामाचे महत्त्व आहे विठ्ठल नामाचे महत्त्व तर सायन्स ने मान्य केलेले आहे जप केल्याने शारीरिक सर्व व्याधी, आजार प्रकोप, दूर होतो हे जगातील विज्ञान क्षेत्राने सुद्धा मान्य केलेले आहे विठ्ठल विठ्ठल नाम जप केल्याने हृदयावरील दाब कमी होतो व आपण सुरक्षित राहतो हे सायन्स ने सिद्धांताद्वारे स्पष्ट केलेले आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी सुरक्षित राहावे व आपले आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करावा असे केल्याने मानवजातीवरील संकट हळू हळू हळू कमी होईल व देशात सर्वत्र सुरळीत पणा येईल पूर्वीसारखे जीवन आपण जगू शकू हीच अपेक्षा।। ! धन्यवाद

Related posts