सोलापूर (प्रतिनिधी): आपल्या महाराष्ट्रात कोरोना संख्या आटोक्यात येण्यासाठी आपलं राज्यशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानादेखील भरमसाठ वाढलेल्या लोकसंख्येमुळे कोरोना रुग्णसंख्या यांची वाढ होतच आहे , ही सर्वांनाच चिंतेची बाब झाली आहे
आपल्या सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पाहता रक्त तपासणी लॅब यांची संख्या कमी पडत असतानाही रक्त तपासणी करणारे स्वतःचा जीव धोक्यात घालून देखील सर्वसामान्य लोकांसाठी रक्त, थुंकी तपासणी सुविधा पुरवीत आहेत.
ह्याच पार्श्वभूमीवर रक्त तपासणी करणाऱ्या खाजगी लॅब यांच्या तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत आणि कोणतीही लॅब ह्या कोरोना काळात बंद पडू देऊ नये यासाठी जीवनज्योत बहुद्देशीय सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप माने यांच्या वतीने आपल्या सोलापूर जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री मा. दत्तात्रय ( मामा ) भरणे यांना निवेदन देण्यात आले, यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर,जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी दिलीप स्वामी, राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव आदी मान्यवर अधिकारी उपस्थित होते.
previous post