तुळजापूर

देविदास पांचाळ यांना राज्यस्तरीय तेजभूषण शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयात कार्यरत असलेले सहशिक्षक देविदास पांचाळ यांना दि.२६ डिसेंबर रोजी वाघोली, पुणे येथे तेजभूषा बहूउद्देशीय सामाजिक विकास संस्था वाशीम, संचलित रंगील काव्यधारा साहित्य कला मंच यांच्या वतीने तेजभूषण शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे.

सहशिक्षक पांचाळ यांच्या आजपर्यंत विविध लेखणीतुन ,तसेच विविध कार्यातून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जातो आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्वत्र श्री. पांचाळ सर यांचे कौतुक केले जाते आहे.

Related posts