कविता 

सैनिकाची दिवाळी- – – –

आमचे सैनिक आहेत
देशाची शान,मान
मनामनात त्यांच्या
बद्दल आहे आदराचे
स्थान

देशात आनंदाची दिवाळी
सुरु आहे,सिमेवर धगधगते
रणागन पेटले आहे

शुर धाड़सी छातीने
गोळ्या झेलत आहेत
देशसाठी बलिदान देत
आहेत

गरवाने ऊर फूलन
येत आहे,रहुदयात
देशप्रेमचे निखारे
पेटत आहेत

सारा देश शांत
ज़ोपला असताना
आमचे वीर जवान
डोळ्यांत तेल घालून
सिमेचे रक्षण करत आहेत

सैनिकाची दिवाळी
दरया,डोंगर कपारी
ऊन वारा,थंडी
बर्फाचे साम्राज्य
रायफल,बंदूक गोळ्यांचे
आवाज धाड़- -धाड़- – -धाड़
सैनिकाची दिवाळी साजरी
होत आहे,
भारत मातेचे सुपुत्र
ऋण फेडत आहेत
जय हिंद।।🙏🏻🙏🏻

कवि
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर.

Related posts