सोलापूर शहर

सोलापूरकरांनो आता तरी घरी राहा 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. दुसर्‍या लाटेत शुक्रवारी रेकॉर्डब्रेक 1500 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसात जिल्ह्यात तब्बल 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 7 तर ग्रामीण भागातील 17 जणांचा समोवश आहे. आणखी 795 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

शुक्रवारी ग्रामीण भागातील 8 हजार 993 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 7 हजार 864 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 1129 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 562 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहरातील 3 हजार 396 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 हजार 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 371 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. 549 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये माळशिरस तालुक्यातील फळवणी येथील 61 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 74 वर्षीय पुरुष, अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील 52 वर्षीय पुरुष आणि तडवळ येथील 50 व 59 वर्षीय पुरुष, बार्शी तालुक्यातील ब्राह्मण गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष, अलीपूर रोड येथील 45 वर्षीय पुरुष, दहिटणे येथील 64 वर्षीय पुरुष, मंगळवेढा तालुक्यातील किल्ला बाग येथील 46 वर्षीय स्त्री, चोखामेळा नगर येथील 80 वर्षीय पुरुष, दत्तू गल्ली येथील 73 वर्षीय पुरुष, घरनकी येथील 78 वर्षीय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्यातील नवीन विडी घरकूल येथील 65 वर्षीय महिला, भंडारकवठे येथील 39 वर्षीय स्त्री, करमाळा भीतनगर येथील 22 वर्षाचे पुरुष, विजापूर रोड सिटीझन पार्क येथील 85 वर्षीय पुरुष, सर्वोदय सोसायटी येथील 76 वर्षीय पुरुष, झोपडपट्टी नं. 1 येथील 75 वर्षीय पुरुष, सुशिल नगर येथील 34 वर्षीय पुरुष यांचे मयत झाले आहे.

आजतागायत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 55 हजार 950, तर शहरातील 21 हजार 37, असे एकूण 76 हजार 987 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील 1362 तर शहरातील 875, अशा एकूण 2237 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागापैकी 6 हजार 802, तर शहरातील 3 हजार 380, अशा एकूण 10 हजार 182 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 47 हजार 787, तर शहरातील 16 हजार 782, असे एकूण 64 हजार 569 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

Related posts