सोलापूर शहर

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने जपली सामाजिक बांधिलकी

५ व्या वर्धापनदिनानिमित्त १०१ गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटप

सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अनावश्यक खर्च न करता १०१ गरजू कुटुंबाना अन्नधान्य किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
      श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने गेल्या चार वर्षात गरिब, निराधार व झोपडपट्टी , कामगार वसाहतीत राहणाऱ्या लोकांना अन्नदान करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. सातत्याने सामाजिक उपक्रमात श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान अग्रेसर असते. यावर्षी सोलापूर शहरातील विविध ठिकाणी जाऊन ज्वारी, गहू, तांदूळ, चना दाळ व साखर असे किट तयार करून १०१  कुटुंबाला लॉकडाऊनच्या या बिकट काळात आधार देण्यात आला. रोटरी आँफ क्लब सोलापूर व सोलापूरातील दानशूर व्यक्तीच्या साहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला. अन्नधान्य मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती राहुल चंडक, प्रशांत राठी, रोटरी क्लबचे रोटे सुहास लाहोटी, रोटे विशाल वर्मा, रेखा झंवर, रमेश जाधव, प्रा.गणेश लेंगरे व श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट उपस्थित होते.
        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश येळमेली, शुभम कासट, गिरधारी कासट, मल्लिकार्जुन यणपे, संतोष अंलकुटे, शुभम हंचाटे, शामकुमार मुळे, शिवशंकर जाधव, निशांत वाघमारे, दिपक बुलबुले, रवि नावदगीकर, मयुर गवते, विश्र्वजीत म्हमाने, सुरेश लकडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लॉकडाऊन काळात विविध उपक्रम : कासट      

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठान लाँकडाऊनमध्ये फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांना जेवण, कोरोना जनजागृती रांगोळी स्पर्धा आयोजित केली. तसेच काढा वाटप केले. पोलीस, डाँक्टर व स्वच्छता कर्मचारी यांना कोरोना योध्दा म्हणून गौरविण्यात आले. १० वी व १२ वी विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका, कम्पासपेटी व प्रशनपत्रिका मोफत मध्ये वाटप करण्यात आले. तसेच कोरोना जनजागृती म्हणून वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती. असे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट यांनी सांगितले.

Related posts