करमाळा

ज्योतिर्लिंग गणेश मित्र मंडळ कुंभेज च्या वतीने जगताप विद्यालयास स्मार्ट टिव्ही स भेट

उमेश पवळ /करमाळा प्रतिनिधी
कोरोना च्या पार्श्वभूमीवर मंडळाचे गणेश उत्सवाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन शिल्लक रकमेतून नामदेवराव जगताप माध्य विद्यालय झरे या विद्यालयास विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट टिव्ही मंडळाचे माजी अध्यक्ष श्री राहूल शिंदे यांचे शुभहस्ते भेट देण्यात आला. यावेळी मंडळाचे सदस्य नवनाथ तोरमल, दशरथ शिंदे, गणेश शिंदे सर, इन्नुस पठाण, नाना तोरमल, कुमार कादगे,जालिंदर माने आवर्जून उपस्थित हो
.यावेळी मंडळाच्या सदस्यांचा सत्कार मुख्याध्यापक श्री दत्तात्रय दळवी सर यांचे शुभहस्ते करण्यात आला. तसेच संस्थेचे सचिव रामहरी घाडगे सर यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले व सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमास विद्यालाचे सशिक्षक धनजय चव्हाण सर , विजय खाडे सर, ज्ञानेश्वर घाडगे सर, दत्तात्रय कदम सर, अमोल मुटके सर, जयसिंग राऊत व हनुमंत चौधरी उपस्थित होते.

Related posts