कविता 

आकाश दिप

आली आली दिवाळी
दारा दारात शोभे सप्तरंगाची
रांगोळी
प्रसन्नतेचा,आनंदाचा प्रकाश
पसरित,तेजोमय वलयांकित
आकाशदीप

आकाशातिल चंद्र चांदण्या
शोभे दारी आकाश दीप
डोले वाऱ्यावरी खिडकी
खिडकीतून विविध रंगाची
करीत उधळण वाजत गाजत
प्रकाश उधळीत आकाशदीप रांगोळीच्या चित्रातून सजे
दीपावलीचा सण ,साजे आकाशदीप

सुंदर रांगोळीतून सजल्या
करंज्या चकल्या लाडू
शंकरपाळे हे तर कलाकाराचे
खास लेणे

आकाशदीप बोले पणतीला
मी आहे तुझ्या जोडीला
उजळून टाकू घरा घरातून
मानवाच्या मना मनातून
आली आली दिवाळी।
आकाशदीप साजे दारो दारी 🙏🏻🙏🏻

कवि:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.

Related posts