अक्कलकोट

अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ बनसोडे यांची निवड

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या अक्कलकोट तालुका अध्यक्षपदी सिद्धार्थ बनसोडे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष अमित गायकवाड ,जिल्हा सरचिटणीस सुरज अरखराव सर, जिल्हा कोषाध्यक्ष सुधाकर साबळे, यांच्या हस्ते देऊन निवड करण्यात आली.

या निवडी प्रसंगी बोलताना तालुक्यातील कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल कामगारांचे कोणतेही अडचणी असो ती कामगार संघाच्या माध्यमातून अक्कलकोट तालुक्यातील सर्व कामगार कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडविला जाईल असे नूतन तालुकाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे यांनी म्हणाले

यावेळी अक्कलकोट वंचित तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडिखांबे, शिलामणी बनसोडे, संदीप मडिखांबे , देवानंद अस्वले अप्पू मडिखांबे,दिलीप मडिखांबे,अब्दुल नाईकवाडी, प्रशांत पाठोळे. दत्ता शिंदे आदी उपस्थित होते

Related posts