उस्मानाबाद  परंडा

श्रीमंतराजे प्रतिष्ठाण व शंभुसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक चिमणी दिवस निमित्त उपक्रमास सुरुवात.

परंडा प्रतिनिधी-

” आठवुनी चिऊ काऊचा घास,घेऊ चिमण्यांच्या संवर्धनाचा ध्यास ” या उक्तीशी अनुसरून नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद (भारत सरकार) संलग्नित श्रीमंतराजे प्रतिष्ठाण व शंभुसेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने 20 मार्च जागतिक चिमणी दिवस या निमित्त पर्यावरण पूरक उपक्रम घेण्यात येत आहे.

चिमण्यांचे घटते प्रमाण याची जाणीव लक्ष्यात घेता प्रतिष्ठाणच्या वतीने शक्य होईल तेवढ्या मोठया प्रमाणात चिमण्यांसाठी घराबाहेर, झाडाच्या फांद्यावरती,परसबागेत,बालकणीमध्ये चारा व पाणी ठेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.उन्हाची वाढती दाहकता यामुळे चिमण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जावे याकरिता प्रयत्न होत आहेत.मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेऊन पक्ष्यांकरिता नवसंजीवनी देण्याचे कार्य प्रतिष्ठाण वतीने करण्यात येत आहे असे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील यांनी सांगितले.

[ एक हाक चिमणीची-
ऊन खूप वाढत आहे घरावरती किंवा घराच्या दारात,झाडाच्या फांद्यावर आम्हाला पाणी व चारा ठेवाल का..? ]

Related posts