पंढरपूर

श्री विठ्ठल मंदिर समिती तर्फे माफक दरात आरोग्य उपचार केंद्र उभारावे.

पंढरपूर – देशामध्ये कोरोना या महाभयंकर रोगाने धुमाकूळ घातलेला आहे. हा रोग आता ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. गेल्या सहा महिन्यापासून देशामध्ये डॉक्टर कमी असल्यामुळे सर्व नागरिकांना अडचणीचा सामनाकरावा लागत आहे.त्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झालेले आहे.उद्योग व्यवसाय बंद पडलेले आहेत.

यामुळे लोकांकडे आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या आशा प्रकारची वाईट परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे. या अशा काळात पंढरपूरचा श्री पांडुरंग हा या महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचे आराध्यदैवत आहे.ज्याप्रमाणे दुष्काळाच्या परिस्थिती संत दामाजीपंतांनी ज्वारीची कोठारे उघडून लोकांचा जीव वाचवला आणि त्याची भरपाई देण्यासाठी स्वयंम श्री विठ्ठलाने अवतार घेऊन त्यांचे रीन चुकते केले.

सध्या कोरोना रोगामुळे खूप भयंकर परिस्थिती निर्माण होऊन महाराष्ट्रातील गोरगरबी, कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजूर अशा सर्व स्तरातील जनतेवर भयंकर संकट आलेले आहे. कित्येक लोक स्वतःकडे असलेल्या जमीनी,जागा, घर, मौल्यवान वस्तू विकून आपल्या कुटुंबाचे पोट भागवत आहेत त्यात स्वतःच्या आरोग्य काळजी घेण्यासाठी तसेच दवाखान्याचा खर्च भगवण्यासाठी ही लागणारे आर्थिक पाठबळ नसल्यामुळे लोक मृत्यू पावत आहेत.

अशा परिस्थितीत विठ्ठलमंदिर समितीतर्फे आरोग्याच्या सर्व तपासण्यासाठी सिटीस्कॅन, सोनोग्राफी, रक्त लघवी चेक अप, आर सी टी टेस्ट आणि इतर आजार वरती माफक दरात उपचार देण्यासाठी आरोग्य केंद्र उभा करावे आणि ज्या पद्धतीने श्री विठ्ठल दामाजीपंतांचे पाठिशी उभे राहिले अशाच पद्धतीने या कोरोनारोगाच्या संकटात सापडलेल्या गोरगरीब भक्तांच्या माऊलींच्या पाठीशी उभा राहणे गरजेचे बनले आहे.
यामुळे वरील मागणीप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांचेकडून पंढरपूर येथे एका अद्यावत आणि भव्य असं माफक दरातील आरोग्य उपचार केंद्र उभारण्यात यावे, या मागणीचे निवेदन दिले.आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांना देण्यात आले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहाजहान शेख,रणजित बागल,अप्पा चोरमले,अक्षय महारनवर,नगरसेवक प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते

Related posts