उस्मानाबाद  तुळजापूर

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा

आज दि. 23 जानेवारी 2021 रोजी तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानी सैनिकी विद्यालय तुळजापूर येथे आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेता हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. स्वातंत्र्य संग्रामात अग्रणी असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दरवर्षी “पराक्रम दिन” म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आज २३ जानेवारीला सुभाष बाबूंची १२५वी जयंती आहे.

भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीकारी फौज उभारणारे सुभाषचंद्र बोस. त्यांनी “तुम मुझे खुन दो मैं तुम्हे आझादी दुंगा” अशी घोषणा दिली आणि तरुणाईचा जनसागर त्यांच्या पाठी उभा राहिला. २३ जानेवारी १८९७ला ओडीसाच्या कटक शहरातील प्रसिद्ध वकिल जानकिनाथ बोस आणि प्रभावती देवींच्या पोटी त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्य संग्रामातील सर्वश्रेष्ठ नेत्यांपैकी ते एक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी आझाद हिंद फौजेच गठण केलं. २१ ऑक्टोबर १९४३ जपानच्या मदतीनं आझाद हिंद सेना बनवली. त्याचे ते सेनापती होते. त्यांनी बनवलेल्या अस्थायी सरकारला जपान, फिलीपींस, कोरिया, चीन, इटली, मान्चुको आणि आयरलँडसहित ११ देशांनी मान्यता दिली होती.अशा थोर विभूतीची.श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली. त्याच बरोबर आज हिंदु ह्रदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचीही जयंती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे. या व्यक्तिमत्त्वानेच मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित केले.

या दोन महापुरुषांची आज जयंती असल्याने त्यानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी रमाकांत सर यांनी केले तर फलक लेखन श्री देविदास पांचाळ सर यांनी केले.

जिल्हा क्रीडा कार्यालय,उस्मानाबाद यांच्या तर्फे दिला जाणारा सन 2018-19 चा जिल्हा गुणवंत संघटक/ कार्यकर्ता क्रीडा पुरस्कार विद्यालयातील क्रीडा शिक्षक श्री बिलकुले राजेश रेशमा यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनी उस्मानाबाद येथे माननीय पालक मंत्री महोदयांच्या हस्ते श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेटीयम उस्मानाबाद येथे होणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री बिलकुले सरांचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related posts